डायबिटीस (Diabetes) हा जीवनशैलीशी निगडीत आजार असून या आजारावर कोणतेही उपचार अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. फक्त वयस्कर लोकांमध्येच नाही तर तरूणांमध्येही या आजाराचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे इतर गंभीर आजारांचाही धोका वाढत आहे. डायबिटीसला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. कारण हळूहळू हा आजार शरीराच्या इतर अवयवांना प्रभावित करतो. जर कुटुंबात कोणाला हा आजार असेल तर तुम्हालाही उद्भवण्याची शक्यता असते. (Ayurveda dr share best home remedy to get rid of diabetes and high blood sugar)
डायबिटीसवर उपचार काय आहेत?
डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला हेल्दी आहाराशिवाय रोज व्यायामाचीही सवय असायला हवी. आयुर्वेदात डायबिटीस कंट्रोलसाठी अनेक उपाय आहेत. डॉक्टर मिहिर खत्री यांनी डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. जे नियमित केल्यानं डायबिटीस वाढण्यापासून रोखता येतो.
पस्तीशीनंतर ट्राय करा आयुर्वेदीक उपाय
जर तुमच्या कुटुंबातील कोणालाही डायबिटीस असेल किंवा त्याची लक्षण दिसत असतील तर तुम्हालाही त्याचा धोका उद्भवू शकतो. म्हणूनच वयाच्या पस्तीशीत तुम्ही एक उपाय करू शकता ज्यामुळे हा धोका टाळता येईल. डॉक्टरांनी सांगितले की जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुम्हाला मधुमेहाचा धोका आहे असे वाटत असेल तर तुम्ही हा आयुर्वेदिक उपाय नियमित वापरून पहा. या उपायाने तुम्ही मधुमेहाचा धोका 80 टक्क्यांपर्यंत कमी करू शकता.
डायबिटीस कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्ही आवळा वापरू शकता. ही अशी औषधी वनस्पती आहे, जी केवळ मधुमेहच नाही तर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांवर उपचार करू शकते. या उपायासाठी आवळा आणि हळद आवश्यक आहे. बाजारात उपलब्ध असलेला कच्चा आवळा पिळून 10 मिली रस काढा.
त्यात अर्धा चमचा हळद मिसळा. हे मिश्रण नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी घ्या. चांगल्या परिणामांसाठी, ते 3 आठवडे सुरू ठेवा, नंतर 2 आठवडे ब्रेक घ्या आणि पुन्हा सुरू ठेवा. आवळ्यासोबत हळद तब्येतीला चांगली असते. त्यामुळे ती नियमित घेणे सुरक्षित असते.