Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात दह्यासोबत काय खावे-काय टाळावे? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, रात्री नुसतं दही खाऊच नये कारण..

उन्हाळ्यात दह्यासोबत काय खावे-काय टाळावे? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, रात्री नुसतं दही खाऊच नये कारण..

Ayurveda Expert Explains How You Should Eat Curd : दह्यासोबत कांदा खाऊ नये? की रात्री जेवताना टाळावे? नक्की खरं काय?

By भाग्यश्री कांबळे | Published: April 22, 2024 07:08 PM2024-04-22T19:08:54+5:302024-04-23T10:25:42+5:30

Ayurveda Expert Explains How You Should Eat Curd : दह्यासोबत कांदा खाऊ नये? की रात्री जेवताना टाळावे? नक्की खरं काय?

Ayurveda Expert Explains How You Should Eat Curd | उन्हाळ्यात दह्यासोबत काय खावे-काय टाळावे? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, रात्री नुसतं दही खाऊच नये कारण..

उन्हाळ्यात दह्यासोबत काय खावे-काय टाळावे? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, रात्री नुसतं दही खाऊच नये कारण..

भाग्यश्री कांबळे

दही (Curd) हे एक डेअरी प्रॉडक्ट आहे. उन्हाळ्यात जास्त प्रमाणात लोक दही खातात (Curd Benefits). दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दह्यामध्ये व्हिटॅमिन-बी १२, प्रोबायोटिक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि प्रोटीनसारखे पोषक घटक असतात (Health Tips). जे शरीरासाठी फायदेशीर असतात. मुख्य म्हणजे उन्हाळ्यात दही, ताक आणि लस्सीचे प्रमाण आपल्या आहारात वाढते. पण दही खाण्याची योग्य पद्धत, दही कोणत्या पदार्थासोबत खावे? कोणत्या पदार्थासोबत टाळावे? याची माहिती फार कमी लोकांना असावी. उन्हाळ्यात अनेक जण हलके आहार म्हणून, रात्रीच्या वेळेस दही-भात, दही - चपाती किंवा नुसतंच दही खातात. पण आयुर्वेदानुसार दही नुसतंच खाणे योग्य मानले जात नाही.

यासंदर्भात वैद्य रजनी गोखले सांगतात, 'दूध आणि फळं एकत्र खाणं आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. तर, दही आणि फळं एकत्र आपण खाऊ शकता. पण दही नुसतं खाऊ नये. त्याच्यासोबत आपण साखर, मुगाचे कढण, आवळा खाऊ शकता. पण रात्री दही खाणं टाळावे. शिवाय दही गरम करून खाऊ नये'(Ayurveda Expert Explains How You Should Eat Curd).

अरे बापरे! एका जोडप्याला स्वित्झर्लंड वारी पडली महागात! फोनचे बिल कोटींच्या घरात, पुढे जे झालं...

रात्री दही का खाऊ नये?

तज्ज्ञांच्या मते, 'रात्री दही कधीही खाऊ नये. दही शरीरातील कफ दोष वाढवू शकते. रात्रीच्या वेळी, शरीरात कफाचे नैसर्गिक प्राबल्य असते. ज्यामुळे जास्त प्रमाणात श्लेष्माचे निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्यांना दमा, खोकला आणि सर्दी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांनी रात्रीच्या जेवणात दही खाणे टाळावे.'

नाश्त्यासह- दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात 'या' वेळेत जेवा..

मग दही नेमकं कधी खावे?

दही आपण दुपारच्या वेळेस खाऊ शकता. पण नुसतं दही कधीही खाऊ नये. आपण यासोबत खडीसाखर, साखर  किंवा आवळा खाऊ शकता. यामुळे नक्कीच आरोग्याला मिळतील. शिवाय दह्याचे पदार्थही आपण खाऊ शकता. पण शक्यतो दही गरम करून खाणं टाळावे. 

Web Title: Ayurveda Expert Explains How You Should Eat Curd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.