Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत पेनकिलर घेणं धोक्याचं, जीवावर बेतेल ! वापरा स्वयंपाकघरातील २ गोष्टी - उत्तम वेदनाशामक आयुर्वेदिक उपाय...

सतत पेनकिलर घेणं धोक्याचं, जीवावर बेतेल ! वापरा स्वयंपाकघरातील २ गोष्टी - उत्तम वेदनाशामक आयुर्वेदिक उपाय...

Ayurveda Gives Worlds Best Painkiller & Anti Inflammatory Remedy For Body Pain : Home Remedies For Natural Pain Relief : थोडं काही दुखलं - खुपलं की पेनकिलर घेण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा असा करा वापर, वेदना झटपट कमी होतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2025 15:26 IST2025-01-10T15:07:57+5:302025-01-10T15:26:52+5:30

Ayurveda Gives Worlds Best Painkiller & Anti Inflammatory Remedy For Body Pain : Home Remedies For Natural Pain Relief : थोडं काही दुखलं - खुपलं की पेनकिलर घेण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा असा करा वापर, वेदना झटपट कमी होतील...

Ayurveda Gives Worlds Best Painkiller & Anti Inflammatory Remedy For Body Pain Home Remedies For Natural Pain Relief | सतत पेनकिलर घेणं धोक्याचं, जीवावर बेतेल ! वापरा स्वयंपाकघरातील २ गोष्टी - उत्तम वेदनाशामक आयुर्वेदिक उपाय...

सतत पेनकिलर घेणं धोक्याचं, जीवावर बेतेल ! वापरा स्वयंपाकघरातील २ गोष्टी - उत्तम वेदनाशामक आयुर्वेदिक उपाय...

आजकाल कोणत्याही आरोग्याच्या लहान - सहान समस्यांवर पेनकिलर घेणे कॉमन गोष्ट झाली आहे. थोडी अंगदुखी, डोकेदुखी किंवा थोडाफार दुखलं - खुपलं की लगेच घे पेनकिलर (Ayurveda Gives Worlds Best Painkiller & Anti Inflammatory Remedy For Body Pain) अशी कित्येकजणांना सवय असतेच. हल्ली ऊटसूट पेनकिलर घेण्याचं प्रमाण बरच वाढलं आहे. डोकेदुखीपासून ते मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीपर्यंत कोणत्याही शारीरिक समस्येसाठी अनेकजण सर्रासपणे पेनकिलर घेऊन मोकळे होतात. परंतु असं डॉक्टरांना न विचारता मनानेच वारंवार पेनकिलर घेणं आरोग्यासाठी अतिशय घातक आहे(Home Remedies For Natural Pain Relief).

डॉक्टरांकडे जाऊन उपचार करण्यापेक्षा पेनकीलर घेणे सोपे असल्याने आपल्याकडे आजही अनेक जण हाच सोपा पर्याय निवडतात.  या पेनकीलरचा आपल्या अवयवांवर विपरित परीणाम होतो. पेनकीलरने आपले दुखणे तात्पुरते थांबत असले तरी त्या दुखण्याचे मूळ शोधून त्यावर योग्य ते उपचार घेणे आरोग्याच्यादृष्टीने केव्हाही चांगले असते. त्यामुळे औषधं घेण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील कोणत्या गोष्टी आपण पेनकीलर म्हणून वापरु शकतो याविषयी हेल्थ एक्सपर्ट तन्मय गोस्वामी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये त्यांनी आयुर्वेदानुसार कोणत्या दोन पदार्थांचा वापर आपण पेनकिलर म्हणून करु शकतो याविषयी अधिक माहिती दिली आहे.  

घरगुती पेनकिलर तयार करण्यासाठीचे साहित्य :- 

१. सुंठ पावडर - ५ ग्रॅम 
२. एरंडेल तेल -५ मिली 
३. पाणी - १०० मिली 

चेहऱ्याला बेसन लावताना दुधात कालवावे की दह्यात? बघा नक्की काय लावल्याने चमकतो चेहरा...


सुपरहिट सिंगर सुनिधी चौहानने 'असं' केलं वजन कमी, काय आहे तिच्या वेटलॉसचा अनोखा फंडा...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एक भांड घेऊन त्यात १०० मिली पाणी उकळवून घ्यावे. 
२. त्यानंतर या उकळत्या पाण्यांत ५ ग्रॅम सुंठ पावडर घाला. 
३. आता या पाण्यांत ५ मिली एरंडेल तेल मिसळा. 
४. सगळ्यात शेवटी हे तिन्ही पदार्थ चमच्याने हलवून पाण्यांत मिक्स करून एकजीव करून घ्यावे. 

अशाप्रकारे आयुर्वेदानुसार, सुंठ आणि एरंडेल तेलाचे पाणी कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावर नैसर्गिक पेनकिलर म्हणून काम करण्यास मदत करेल. हा तयार काढा आपण दिवसांतून २ वेळा पिऊ शकतो.  

या दुखण्यांवर आहे असरदार... 

१. सांधेदुखी 
२. कंबरदुखी 
३. पोटदुखी 
४. ओटी पोट दुखणे 
५. गुडघेदुखी 

१. सुंठ पावडर :- सुंठ पावडर हा वेदनाशमन करण्यासाठी स्वयंपाकघरात आढळणारा एक उत्तम पदार्थ आहे. अ‍ॅसिडीटी, जळजळ, सूज, सांधेदुखी आणि इतरही अनेक उपायांसाठी आलं अतिशय उपयुक्ट ठरतं. मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरला जाणारा हा पदार्थ साधारणपणे आपल्या घरात असतोच. तेव्हा कोणत्याही दुखण्यावर सुंठ पावडरमधील गुणधर्म जालीम उपाय ठरु शकतात. 

२. एरंडेल तेल :- एरंडेल तेलामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. या तेलाच्या वापराने कोणत्याही प्रकारचे दुखणे किंवा वेदना   कमी करण्यास अधिक मदत होते. अती काम किंवा कामाची दगदग, ताणतणाव तसेच आरोग्य समस्येमुळे कोणत्याही प्रकारचे दुखणे डोकं वर काडू शकते.  शरीरावरचा ताण आणि त्यातून निर्माण होणारी छोटी - मोठी दुखणी कमी करण्यासाठी तुम्ही एरंडेल तेलाचा वापर करू शकता.

Web Title: Ayurveda Gives Worlds Best Painkiller & Anti Inflammatory Remedy For Body Pain Home Remedies For Natural Pain Relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.