Join us

हिवाळ्यात अंगावर पित्त येऊन खूप खाज सुटते? बघा का होतो शीतपित्ताचा त्रास आणि त्यावरचे उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2024 13:23 IST

Ayurveda Home Remedies For Urticaria or Sheetapitta: हिवाळ्यात अंगावर पित्त येण्याचा त्रास खूप जणांना होतो. बघा काय आहेत यामागची नेमकी कारणं...(main reasons for sheetapitta) 

ठळक मुद्दे शीतपित्ताचा त्रास होण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुम्हाला ज्याची ॲलर्जी आहे, असा एखादा पदार्थ तुमच्या खाण्यात येणे किंवा मग तुम्ही त्या पदार्थाच्या संपर्कात येणे.

हिवाळा आता चांगलाच सुरु झाला आहे. हिवाळा सुरू झाला म्हणजे सगळ्यात आधी त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. कोरड्या पडलेल्या त्वचेला आधीच खूप खाज येते. त्यात जर काही लोकांना शीतपित्ताचा त्रास असेल तर त्यांचा त्रास तर विचारायलाच नको. त्वचेवर लालसर चट्टे आल्यासारखे होते आणि त्यांनाही खूप जास्त खाज येते. आधीच हिवाळ्यामुळे कोरडं पडलेलं अंग जास्त खाजवलं तर बऱ्याचदा त्यातून थोडं रक्त येऊन जखमसुद्धा होते (Ayurveda Home Remedies For Urticaria or Sheetapitta). हा त्रास नेमका का होतो आणि तो कसा कमी करावा, याविषयी बघा ही खास माहिती..(main reasons for sheetapitta)

 

शीतपित्ताचा त्रास होण्यामागची कारणं

१. शीतपित्ताचा त्रास होण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुम्हाला ज्याची ॲलर्जी आहे, असा एखादा पदार्थ तुमच्या खाण्यात येणे किंवा मग तुम्ही त्या पदार्थाच्या संपर्कात येणे. शीतपित्ताचा त्रास होण्यामागे हे सगळ्यात मोठं कारण आहे. 

२. दुसरं कारण म्हणजे एखादा किडा चावल्याने किंवा सल्फा औषधांच्या संपर्कात आल्यानेही पित्ताचा त्रास होतो.

१ महिन्यात उतरेल वजन- पाेट होईल सपाट, हिवाळ्यात झटपट वेटलॉससाठी नाश्त्यामध्ये खा ४ पदार्थ

३. तीव्र सुर्यप्रकाशात जाणे, खूप उष्ण पदार्थ खाणे यामुळेही काही जणांना शीतपित्ताचा त्रास होऊ शकतो.

४. धूळ, धूर, प्रदुषण, हवेतील परागकण यांच्या संपर्कात आल्यानेही काही जणांच्या अंगावर पित्त उठते.

५. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कपड्याची जर तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा त्वचा खूप नाजूक असल्याने एखादा कपडा सहन झाला नाही, तरीही काही जणांना पित्ताचा त्रास होतो.

 

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

अंगावर पित्त येण्याचा खूप त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणेच अधिक उत्तम. पण त्याआधी या काही गोष्टीही तुम्ही करून पाहू शकता..

१. सगळ्यात पहिलं म्हणजे अंगावर जेव्हा पित्त येतं तेव्हा तुम्ही कोणकोणते पदार्थ खाल्ले आहेत याबाबतीत एकदा थोडं निरिक्षण करा आणि नेमकी कशाची ॲलर्जी होते आहे हे एकदा तपासून पाहा.

डॉक्टर सांगतात हिवाळ्यात मुलांना सर्दी- खोकला झाल्यास तुपात २ गोष्टी टाकून द्या- चटकन बरं वाटेल

२. अमसूलचा सार किंवा कोकम सरबत प्या. अमसूलाची पेस्ट करून ती अंगावर लावल्यानेही पित्त बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

३. पित्तामुळे अंगावर खाज येत असल्यास खोबरेल तेल किंवा कोरफडीचा गर लावा. अंगाची खाज, दाह कमी होण्यास मदत होईल.

४. रात्री झोपण्यापुर्वी चमचाभर एरंडेल तेल प्या. यामुळे रोजच्यारोज पोट साफ होऊन पित्ताचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपायथंडीत त्वचेची काळजीत्वचेची काळजी