Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा; बळकट हाडं-आजार राहतील लांब

थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा; बळकट हाडं-आजार राहतील लांब

Benefits Of Soaked Dates And Khajoor (Khajoor Khanyache Fayde) :  खजूरात व्हिटामीन सी, व्हिटामीन डी यांसारखी पोषक तत्व असतात. एंटी ऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 01:30 PM2024-03-26T13:30:05+5:302024-03-26T17:07:54+5:30

Benefits Of Soaked Dates And Khajoor (Khajoor Khanyache Fayde) :  खजूरात व्हिटामीन सी, व्हिटामीन डी यांसारखी पोषक तत्व असतात. एंटी ऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे.

Ayurveda Told 14 Health Benefits Of Soaked Dates And Khajoor For Weakness | थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा; बळकट हाडं-आजार राहतील लांब

थोडं काम केलं तरी कंबर-पाठ दुखते? खजूर 'या' पद्धतीने खा; बळकट हाडं-आजार राहतील लांब

खजूर खाण्याबद्दल अनेकांचा असा गैरसमज असतो की ते शरीराला फार  गरम पाडतात. अनेकांना असं वाटतं की खजूर शरीराला गरम पडतात. आयुर्वेदानुसार खजूर खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. पित्त विकार दूर करण्यासाठी खजूर फायदेशीर ठरतात. (Health Benefits Of Soaked Dates) खजूरात फायबर्स, आयर्न, कॅल्शियम, व्हिटामीन, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.  खजूरात व्हिटामीन सी, व्हिटामीन डी यांसारखी पोषक तत्व असतात. एंटी ऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. (Ayurveda Told 14 Health Benefits Of Soaked Dates And Khajoor For Weakness)

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार खजूरात एंटी ऑक्सिडेंट्स  कॅरोटीनॉईड्स आणि फिनोलिक्स असतात. याव्यतिरिक्त खजूरात  पोटॅशियम आणि फॉस्फरेस, मॅग्नेशियम यासांरखी पोषक तत्व असतात.(Ref)  नियमित खजूर खाल्ल्यानं गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी दिलेल्या माहितीनुसार खजरू खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.  खजूर नेहमीच भिजवून खायला हवेत.

खजूर खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Dates)

खजूर खाल्ल्याने गॅस, एसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते, हाडं मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते, पुरूष आणि महिलां दोघांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते, मेंदूचे आरोग्य चांगले राहते. शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही, वजन नियंत्रणात राहते, सूज कमी होते, त्वचा आणि केस चांगले राहतात.

खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती? (Right Time To Eat Dates)

सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाता येतात, नाश्त्याच्या वेळेस तुम्ही खजूर खाऊ शकता, दिवसभरात कधीही गोड खाण्याची इच्छा  झाल्यास खजूर खा, रात्री झोपण्याच्या आधी खजूर खाऊ शकता. 

एका दिवसाला किती खजूर खायचे? (How Many Dates Should You Eat a Day)

रोज २ खजूर खाऊन तुम्ही दिवसाची सुरूवात करू शकता. वजन वाढू नये यासाठी रोज ४ खजूर खा.

खूप मेहनत करूनही वजन कमी नाहीये? या आजारामुळे वजन घटवणं होतं कठीण-४ वेट लॉस टिप्स

खजूर भिजवून का खावेत? (Best Way to Eat Dates)

भिजवलेल्या खजूरात टॅनिन, फायटिक एसिड असत, त्यातील पोषक तत्व पोषण देतात.  खजूर पचायला चांगले असतात. म्हणून खजूरातून जास्तीत जास्त पोषण मिळते. रात्री झोपताना भिजवून टेवा. खजूर भिजवल्याने त्याली टॅनिक आणि फायटीक एसिड निघून जाते.  खजूर भिजवल्याने पचनक्रिया चांगली राहते, याशिवाय शरीराला भरपूर पोषण मिळते.

लहान मुलांसाठी खजूर कसे फायदेशीर ठरते?

खजूर मुलांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. हिमोग्लोबिनची कमतरता आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याासाठी रोज खजूर खाणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Ayurveda Told 14 Health Benefits Of Soaked Dates And Khajoor For Weakness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.