हिरवी चटणी खायला जितकी टेस्टी लागते तितकेच तिचे फायदेसुद्धा आहे. कोथिंबीर, पुदीन्याची पानं, हिरवी मिरची, लसूण, आलं, लिंबाचा रस आणि वेगवगेळ्या मसाल्यांनी तयार केलेल्या चटणीची चव आरोग्यासाठी डबल डोस आहे. चटणीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. कोथिंबीर, पुदिना, व्हिटामीन-ए, सीचा चांगला स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त हिरवी चटणी एंटी ऑक्सिडेंनी परिपूर्ण असते. ज्याच्या नियमित सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. (How To Homemade Ayurvedic Chutney)
आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यामते हिरवी चटणी इम्यून सिस्टीम चांगली ठेवते. ब्लड शुगर नियंत्रणात राहतं, झोपेची गुणवत्ता सुधारते. (Cholesterol Control Tips) थायरॉईड, भूक कंट्रोल करण्यास मदत होते. पीसीओएस, कोलेस्टेरॉल, हाय बीपी, पीसीओएस, थकवा आणि केस गळण्याची समस्या उद्भवत नाही. (Ayurveda Told How To Homemade Ayurvedic Chutney To To Make Homemade Ayurvedic Chutney)
चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य (ingredients For Chutney)
मूठभर कोथिंबीर
१२ ते १५ पुदिन्याची पानं
१० ते १५ कढीपत्ते
१ आवळा
२ हिरव्या मिरच्या
१ इंच आलं
२ लसणाच्या कळ्या
दीड चमचा साधं काळं मीठ
१ चमचा जीरं पावडर
१ मूठ भाजलेले चणे
१ छोटा चमचा सुर्यफुलाच्या बियांचे मिश्रण
अर्ध्या लिंबाचा रस
२ बर्फाचे तुकडे
चटणी बनवण्याची योग्य पद्धत कोणती? (How To Make Green Chutney For Cholesterol Control)
सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्या नंतर चटणी खाण्यासाठी तयार असेल. ही चटणी तुम्ही भात चपाती, ब्रेडबरोबर खाऊ शकता. जेवणाबरोबर १ मोठा चमचा खाऊ शकता. एका आठवड्यासाठी फ्रिजमध्ये चटणी स्टोअर करून ठेवा. बर्फाच्या ट्रेमध्ये तुम्ही १ महिना ही चटणी साठवून ठेवू शकता. याव्यतिरिक्त त्वचा चांगली ठेवण्यासाठी, उर्जा मिळण्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी रक्त साफ करण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी चांगला ऑपश्न आहे.