Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दह्यात कांदा घालून खाता? मग गॅसेसचा त्रास होणारच; दही - कांदा एकत्र खात असाल तर..

दह्यात कांदा घालून खाता? मग गॅसेसचा त्रास होणारच; दही - कांदा एकत्र खात असाल तर..

Ayurveda: You should not combine curd with Onion : कोशिंबिरीत कांदा घालून खात असाल तर, आत्ताच टाळा; पचन बिघडेल आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2024 05:44 PM2024-11-22T17:44:17+5:302024-11-22T17:46:35+5:30

Ayurveda: You should not combine curd with Onion : कोशिंबिरीत कांदा घालून खात असाल तर, आत्ताच टाळा; पचन बिघडेल आणि..

Ayurveda: You should not combine curd with Onion | दह्यात कांदा घालून खाता? मग गॅसेसचा त्रास होणारच; दही - कांदा एकत्र खात असाल तर..

दह्यात कांदा घालून खाता? मग गॅसेसचा त्रास होणारच; दही - कांदा एकत्र खात असाल तर..

ऋतू कोणताही असो, दही (Curd) खाण्याचे असंख्य फायदे आहेत. स्वयंपाक (Kitchen Tips) करण्यासाठी आपण दूध, दही, मलई किंवा विविध मसाल्यांचा वापर करतो (Health Tips). यामुळे पदार्थाची चव वाढते. दही बहुतांश पदार्थात वापर होतो. दही पोटासाठी चांगले आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. पण दह्यामध्ये काही गोष्टी घालून टाळणे केव्हाही बरे.

काही लोक फक्त दही खाणं टाळतात. त्यात कांदा घालतात. पण दही - कांदा खाणं कितपत चांगलं?  बऱ्याचदा कोशिंबीर करताना आपण त्यात कांदा घालतो. पण दही - कांदा नकळत आपले आरोग्य बिघडवू शकते(Ayurveda: You should not combine curd with Onion).

नोएडा स्थित 'कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक'चे संचालक डॉ कपिल त्यागी सांगतात, ''अनेकांना कोशिंबीरमध्ये कांदा घालून खायला आवडते. परंतु, कोशिंबीरमध्ये कांदा घालून खाणे, आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.''

दही - कांदा खाण्याचे दुष्परिणाम

- दही आणि कांद्याचे गुणधर्म वेगळे आहेत. कांद्याचा स्वभाव उष्ण आणि दही थंड असल्याने हे दोन्ही एकत्र खाणं, आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.

तेलाचा एक थेंबही न वापरता करा ८ प्रकारचे सूप, थंडीत रोज प्या गरमागरम सूप-वजन करा कमी!

- दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. तर कांद्यामध्ये फायबर आणि सल्फर संयुगे आढळतात. जे एकत्र खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकते. अशा परिस्थितीत, व्यक्तीला पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

गॅस समस्या

दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात.  जर आपल्याला पोटाचे विकार असतील तर, दही - कांदा एकत्र खाणे टाळा. या दोन गोष्टींच्या मिश्रणामुळे पोटाचा त्रास वाढू शकतो.

पोषकद्रव्ये शोषून घेण्यास अडचण

- कांद्यामध्ये सल्फर असते. दह्यामध्ये कांदा घालून खाल्ल्याने, कॅल्शियमसारख्या पोषक तत्वांचे शोषण करण्यास शरीराला अडथळा येऊ शकते.

हिवाळ्यात थंड पाण्यात हात न घालता भांडी कशी घासाल? ३ टिप्स- भांडी होतील चकाचक

- आयुर्वेदानुसार दही - कांदा एकत्र खाऊ नये. कांदा आणि दही कोणत्याही डिशची चव आणि पोत खराब करू शकतात. कांद्याची चव तिखट असते. तर, दह्याची चव मलईदार असते. यामुळे दह्याची चव बिघडते.

- दूध आणि दही, उडीद डाळ, कैरी आणि दही यासारख्या काही गोष्टी एकत्र खाऊ नये. यामुळे आरोग्य बिघडू शकते. 

Web Title: Ayurveda: You should not combine curd with Onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.