Join us   

दही-कांदा एकत्र खावा का? दह्यात कांदा घालून खाल्ला तर पचन बिघडतं की सुधारतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 6:30 PM

Ayurveda: You should not combine curd with onion दही घालून केलेल्या कोशिंबिरीत, सॅलेडमध्ये अनेकजण कांदा घालतात, पण तो पोटाला बरा की अपायकारक?

दही खाण्याचे असंख्य फायदे आहेत. बाराही महिने दही खाण्यात येते. दह्याचा वापर अनेक पदार्थात केला जातो. दही पदार्थांमध्ये मिसळताच, त्याची चव दुप्पटीने वाढते. काही लोकांना दररोज दही खाण्याची सवय असते. त्यात कांदा, हिरवी मिरची, मसाले, टोमॅटो, काकडी, इतर भाज्या मिक्स करून खाल्ली जाते. ही कोशिंबीर आरोग्यासाठी देखील चांगली मानली जाते.

परंतु, दह्यासोबत काय खावे, काय टाळावे याची माहिती आपल्याला आहे का? दही खावे पण त्यासोबत काही गोष्टी खाणे टाळणे गरजेचं आहे. ज्यात कांद्याचा देखील समावेश आहे. आता तुम्ही म्हणाल कोशिंबीरमध्ये, दह्यासोबत कांदा देखील असतो. परंतु, कांदा आणि दह्याचे कॉम्बिनेशन वाईट कसे?(Ayurveda: You should not combine curd with onion).

नोएडा स्थित 'कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक'चे संचालक डॉ कपिल त्यागी सांगतात, ''अनेकांना कोशिंबीरमध्ये कांदा घालून खायला आवडते. परंतु, कोशिंबीरमध्ये कांदा घालून खाणे, आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.''

साखर खाणंच बंद केलं तर? महिनाभरात तब्येतीत दिसतील ५ बदल, करुन तर पाहा

आयुर्वेदानुसार, दही आणि कांदा हे विरुद्ध अन्न मानले गेले आहे. दही थंड तर कांदा गरम असतो, हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात वात, पित्त आणि कफ या दोषांचे असंतुलन निर्माण होते. ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होते.

दही - कांदा एकत्र खाण्याचे नुकसान

डॉक्टरांच्या मते, ''दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. अपचन, आम्लपित्त, सूज येणे आणि पोटाच्या इतर समस्या छळू शकतात.''

शरीरात वाढू शकते उष्णता

दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते. ज्यामुळे त्वचेवर ऍलर्जी, पुरळ, एक्जिमा आणि सोरायसिससारख्या समस्येचा त्रास निर्माण होतो.

वजन कमी करायचं म्हणून आवडता भात बंद? भात कुणी आणि किती खाल्ला तर वजन हमखास कमी होते

अन्न विषबाधा होण्याचा धोका

दही - कांदा एकत्र खाल्ल्याने पोट आणि आतड्यांमध्ये गंभीर समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकते. यामुळे मळमळ, उलट्या, शरीरात पाण्याची कमतरता हा त्रास दिसून येतात.

दह्यात कांदा मिसळण्याची योग्य पद्धत

कांदा तळल्यानंतर त्यात दही मिसळल्यास त्याचा प्रभाव कमी होतो. कांदा भाजल्यानंतर त्यातील सल्फरची पातळीही कमी होते. अशा पद्धतीने आपण दह्यात कांदा मिक्स करून खाऊ शकतो. परंतु, कांद्याचे पोषक तत्व गरम करून किंवा तळून नष्ट होत नाही, त्यामुळे कमी प्रमाणात दह्यात याचा वापर करावा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य