Join us

असह्य वेदना, लघवी करताना जळजळ होते? २ नॅचरल उपाय, किडनी स्टोनचा त्रास होतो कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:22 IST

Kidney Stone Home Remedies : स्टोनचा आकार जर मोठा असेल तर सर्जरी करण्याचीही वेळ येते. मात्र, स्टोन जर लहान आकाराचे असतील तर काही नॅचरल उपायांनी देखील बाहेर काढता येतात. 

Kidney Stone Home Remedies : ज्यांना किडनी स्टोनची समस्या झाली आहे त्यांनी पुन्हा किडनी स्टोनचं नावही ऐकलं तर त्यांच्या अंगावर काटा येतो. कारण किडनी स्टोन ही अशी समस्या आहेत, ज्यात असह्य वेदना होतात. आजकालच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ही समस्या खूप वाढली आहे. महिला असो वा पुरूष सगळ्यांनाच ही समस्या होते. स्टोनचा आकार जर मोठा असेल तर सर्जरी करण्याचीही वेळ येते. मात्र, स्टोन जर लहान आकाराचे असतील तर काही नॅचरल उपायांनी देखील बाहेर काढता येतात. 

किडनी स्टोन झाल्यावर लघवी करताना जळजळ, पिवळी लघवी येणे, पाठ दुखणे, ओटीपोट दुखणं, लघवीतून रक्त येणे अशी काही लक्षणं दिसतात. किडनी स्टोनची एक मोठी समस्या म्हणजे एकदा किडनी स्टोन झालेल्या व्यक्तींना पुन्हा किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो. तसेच ही समस्या आनुवांशिकही असते. 

अशात किडनी स्टोनची ही समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक स्पेशलिस्ट डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत. 

जवाचं पाणी

मुठभर जव घ्या. २ ग्लास पाण्यात टाकून हे जव उकडा. जेव्हा पाणी अर्ध राहील तेव्हा गाळून घ्या. हे पाणी दिवसभर एक एक घोट घेत प्या. काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल. स्टोन निघून गेल्यावर हे पाणी तुम्ही आठवड्यातून १ ते २ वेळा पिऊ शकता. यानं पुन्हा किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.

कुळीथ डाळ

किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी कुळीथ डाळ खूप फायदेशीर मानली जाते. डॉक्टरांनुसार, आठवड्यातून २ ते ३ वेळा कुळीथ डाळ खाऊ शकता. असं केल्यास कॅल्शिअम ऑक्सालेटनं होणाऱ्या स्टोनचा धोका कमी होईल. 

किडनी स्टोन होण्याची कारणं...

नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, किडनी स्टोन होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. कमी पाणी पिणं, कमी किंवा फार जास्त एक्सरसाईज करणं, लठ्ठपणा, वेट लॉस सर्जरी किंवा शुगर किंवा जास्त मीठ खाल्ल्यानं किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स