Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > छातीत जळजळ, गॅसमुळे जेवण जात नाही? डॉक्टरांनी सांगितले 3 उपाय, पोटाचे त्रासच होतील लांब

छातीत जळजळ, गॅसमुळे जेवण जात नाही? डॉक्टरांनी सांगितले 3 उपाय, पोटाचे त्रासच होतील लांब

Home Remedies for Acid Reflux : आयुर्वेदीक डॉक्टर दिक्षा भावसार यांनी एसिडीटी,  गॅस टाळण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:27 PM2023-02-08T12:27:57+5:302023-02-08T12:45:18+5:30

Home Remedies for Acid Reflux : आयुर्वेदीक डॉक्टर दिक्षा भावसार यांनी एसिडीटी,  गॅस टाळण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

Ayurvedic home remedies for acid reflux gerd acidity heartburn bloating and gas | छातीत जळजळ, गॅसमुळे जेवण जात नाही? डॉक्टरांनी सांगितले 3 उपाय, पोटाचे त्रासच होतील लांब

छातीत जळजळ, गॅसमुळे जेवण जात नाही? डॉक्टरांनी सांगितले 3 उपाय, पोटाचे त्रासच होतील लांब

गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लेक्स डिसीज पचनाशी (Gastroesophageal Reflux Disease) निगडीत गंभीर आजार आहे ज्याला एसिड रिफ्लेक्स असंही म्हटलं जातं. जेव्हा वांरवार हा त्रास होतो गॅस, छातीत जळजळ (Esophagus) जाणवते. आंबट ढेकर,  छातीत जळजळ, उलट्या ही लक्षणं दिसतात. अन्न पचण्यासाठी एसिडची आवश्यकता असते पण याचे प्रमाण वाढते. आतड्यात जाण्याऐवजी वरच्या बाजूनं त्याचे प्रमाण वाढते. आयुर्वेदीक डॉक्टर दिक्षा भावसार यांनी एसिडीटी,  गॅस टाळण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. (Ayurvedic home remedies for acid reflux gerd acidity heartburn bloating and gas)

पोटात जळजळ हिटबर्न

पोटात एसिड रिफ्लेक्स होणं खूपच कॉमन आहे. तुमच्या छातीच्या हाडामागे जळजळ होते. ही जळजळ पाठीच्या खालच्या भागातून घशात जाऊ शकते. जेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेच्या अस्तरात परत येते तेव्हा असे होते. हे काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकू शकते.

स्तन ओघळलेत? सैल झाल्यासारखे वाटतात; सुडौल, मेंटेन फिगरसाठी घरीच करा ४ सोपे व्यायाम

 ही समस्या उद्भवते जेव्हा न पचलेले अन्न पोटातील ऍसिडसह पोटातून अन्ननलिकेकडे परत जाते. यामुळे तुम्हाला ढेकर येऊ शकते आणि तोंडात आंबट पाणी येऊ शकते. जास्त खाणे, जेवणानंतर लगेच व्यायाम करणे किंवा खाल्ल्यानंतर वाकणे यामुळे हे लक्षण होऊ शकते.

डिसफॅगिया म्हणजे गिळण्यास त्रास होणे. आपले अन्न आपल्या घशात किंवा छातीत अडकल्यासारखे वाटणे. हे ऍसिड रिफ्लक्समुळे होऊ शकते. अॅसिड रिफ्लक्स हे पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत गेल्यामुळे होते. घसा सर्वात जास्त प्रभावित होतो, ज्यामुळे घसा खवखवणे, कोरडा खोकला आणि घरघर होऊ शकते. यामुळे तुमचा आवाज कर्कश होऊ शकतो.

अॅसिड रिफ्लक्समुळे, तुम्हाला खोकला येऊ शकतो आणि तो दीर्घकाळ टिकू शकतो. खोकला हे खरेतर अन्ननलिकेमध्ये पोटातील ऍसिड वाढण्याची क्रिया म्हणून पाहिले जाते. जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेट द्या किंवा काही घरगुती उपाय करून पाहा.

गॅससाठी आयुर्वेदीक उपाय

पोटात जाणवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहे. सगळ्यात आधी १ ग्लास पाण्यात  १ चमचा धणे, ५ पुदीन्याची पानं आणि १५ कढीपत्ते घाला. १५ कढीपत्ते घाला आणि ५ मिनिटं उकळून घ्या हे पाणी  सकाळी गाळून या पाण्याचं सेवन करा. रोज जेवल्यानंतर बडीशोप खा.  १ कप पाणी ३ मिनिटं उकळा आणि गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि ५ मिनिटं उकळून घ्या. रात्री झोपण्याआधी अर्धा तास उकळून  हे पाणी गाळून प्या.

Web Title: Ayurvedic home remedies for acid reflux gerd acidity heartburn bloating and gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.