हल्ली वयाचा आणि गुडघेदुखीचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण पुर्वी साधारण चाळिशी किंवा पन्नाशीनंतर गुडघेदुखीचा त्रास सुरू व्हायचा. पण आता मात्र तरुण मंडळीही गुडघे दुखत आहेत, अशी तक्रार करताना दिसतात. काही जणांचं वजन खूप वाढलेलं असतं. वाढत्या वजनामुळे त्यांना लवकर गुडघेदुखी सुरू होते. काही जणांचं बैठं काम जास्त असल्याने गुडघ्यांचा व्यायाम होतच नाही आणि त्यामुळे मग गुडघे आखडून जातात आणि दुखायला लागतात. वयानुसार गुडघेदुखीचा त्रासही अनेक वयस्कर मंडळींना होतोच (how to reduce joint pain and knee pain in winter?). गुडघेदुखीने हैराण असणाऱ्या अशा सगळ्यांसाठीच घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणारं एक खास तेल खूप उपयुक्त ठरणारं आहे (Ayurvedic homemade oil for reducing joint pain and knee pain). ते तेल कसं तयार करायचं ते पाहा..(how to make pain relief oil at home?)
गुडघेदुखी कमी करण्यासाठी उत्तम घरगुती तेल
गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी घरच्याघरी तेल कसं तयार करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ
nuttyovernutritionn या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हे तेल करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये २ वाट्या मोहरीचं तेल टाका.
मोहरीचं तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये १ टेबलस्पून ओवा, १ टेबलस्पून लवंग टाका.
त्यानंतर त्यामध्ये २ टेबलस्पून मेथ्या आणि लसूणाच्या ८ ते १० पाकळ्या टाका. लसूण उष्ण असतो. त्यामुळे हिवाळ्यात अशा पद्धतीच्या लसूणयुक्त तेलाने गुडघ्यांना मालिश करणे फायदेशीर ठरते.
रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल
त्यानंतर तेलामध्ये ओल्याा हळदीचे काही तुकडे आणि १ टेबलस्पून कापुर टाका. असे सगळे पदार्थ टाकल्यानंतर तेलाला १० ते १५ मिनिटे मंद आचेवर चांगले उकळू द्या.
त्यानंतर गॅस बंद करा. तेल थंड होऊ द्या आणि नंतर ते एखाद्या बाटलीमध्ये, बरणीमध्ये भरून ठेवा. रोज रात्री या तेलाने गुडघ्यांना मालिश करा. मालिश करण्यापुर्वी तेल थोडे कोमट करून घ्यावे.