Join us   

सारखी ॲसिडीटी होते, पोट नीट साफच होत नाही? ५ उपाय, मिळेल झटपट आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2023 3:49 PM

Ayurvedic Remedies For Constipation and Acidity : पाहूयात ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेसाठी घरात असणाऱ्या नैसर्गिक पदार्थांचा कसा उपयोग होतो.

आपले आरोग्य उत्तम राहायचे असेल तर पोटाचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक असते. पोट वेळच्या वेळी साफ होत असेल तर तब्येत चांगली राहते, नाहीतर सतत आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतात. कोठा जड झाला तर आपण कॉन्स्टीपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता झाली असे म्हणतो. अशावेळी अनावश्यक गोष्टी पोटात साठून राहतात आणि आपल्याला सिडीटी, गॅसेस, मळमळ अशा काही ना काही समस्या उद्भवतात. आता अशावेळी काय करायचं आपल्याला सुचत नाही. मग आपण तात्पुरती ॲसिडीटी कमी व्हावी किंवा पोट साफ व्हावं म्हणून काहीतरी गोळ्या-औषधं घेत राहतो. पण अशाप्रकारची औषधं दिर्घकाळ घेणं आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगलं नसतं. त्यामुळे अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पाहूयात ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेसाठी घरात असणाऱ्या नैसर्गिक पदार्थांचा कसा उपयोग होतो (Ayurvedic Remedies For Constipation and Acidity) .  

१. त्रिफळा 

आवळा, हरीतकी आणि बिभितकी या ३ पदार्थांपासून त्रिफळा चूर्ण तयार होते. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

२. हिंग 

हिंग पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी अतिशय उपयुक्त घटक आहे. म्हणूनच आपण प्रत्येक पदार्थाची फोडणी करताना आवर्जून हिंगाचा वापर करतो. 

(Image : Google)

३. इसबगोल 

ही अशीच एक औषधी गोष्ट असून यामध्ये नैसर्गिक फायबरचे प्रमाण चांगले असते. फायबरमुळे पोट साफ होत असल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी इसाबगोलचा फायदा होतो. 

४. आलं 

आलं ही एक औषधी वनस्पती आहे हे आपल्याला माहितच आहे. यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असल्याने पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी आल्याचा फायदा होतो. गॅसेस आणि पोटातील सूज कमी करण्यासाठी आल्याचा चांगला उपयोग होतो. 

५. बडीशेप 

पचनक्रिया सुधारण्यासाठी बडीशेप हा एक उत्तम पदार्थ आहे. म्हणूनच आपल्याकडे पूर्वीपासून जेवणानंतर बडीशेप खाण्याची पद्धत आहे. गॅसेस, सूज आणि बद्धकोष्ठता यावर बडीशेप खाणे हा उत्तम उपाय असतो.    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स