शरीराच्या चांगल्या कार्यासाठी पाणी पिणं गरजेचं असतं. जर तुम्ही पाणी कमी प्यायल्यात जर गंभीर आजारही उद्भवू शकतात. आयुर्वेदात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पिण्याचे बरेच फायदे सांगण्यात आले आहेत. (Ayurvedic rules to drink water that you must know) आयुर्वेद ऋषी भाव मिश्र यांनी सोळाव्या शतकात कोमट पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण सांगितले आहे. डॉ. वरलक्ष्मी यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Ayurvedic sage explains right amount and time to drink warm water on empty stomach)
१) सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याला आयुर्वेदात उषापान असं म्हणतात. आचार्य भाव मिश्र यांनी सांगितले की, रिकाम्या पोटी ६४० मिलीलीटर कोमट पाणी प्यायला हवं. हा निरोगी राहण्याचा उत्तम उपाय आहे.
२) आयुर्वेदीक आचार्य यांनी उषापानच्या योग्यवेळेबद्दल माहिती दिली आहे. डॉक्टरांच्यामते त्यांनी या प्रक्रियेचा शुभ मुहूर्त सकाळी सुर्य उगवण्याच्या आधीचा असल्याचं सांगितलं आहे. सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये या वेळेला उठणंच कठीण झालं आहे.
३) आजकाल बहुतेक लोक सकाळी 6 ते 10 च्या दरम्यान उठतात. आयुर्वेद त्याला कफ काल म्हणतो आणि या काळात आपली चयापचय क्रिया खूप कमकुवत असते. म्हणूनच यावेळी इतके पाणी पचणे कठीण आहे.
४) रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने ब्लोटींग, पोटदुखी, गॅस, एसिडीटीपासून आराम मिळतो. सुर्य उगवण्याआधी उठण्याचा प्रयत्न करा. फिजिकल एक्टीव्हीज वाढवा.
पाणी पिताना या चुका टाळा
जर तुम्ही उभे राहून पाणी पीत असाल तर त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरातील आवश्यक पोषक तत्वांचे योग्य शोषण होण्यास प्रतिबंध होतो. नेहमी बसून पाणी प्या आणि एक एक घोट करून प्या जेणेकरून ते तुमच्या शरीरात व्यवस्थित पोहोचेल.
तहान लागल्यानंतरच पाणी प्या
जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या शरीरातील डिहायड्रेशनची कल्पना असते. ओव्हर डायड्रेशन म्हणजेच गरजेपेक्षा जास्त पाणी पिणंसु्दधा तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. म्हणून तहान लागल्यानंतरच पाणी प्या.
थंड पाणी पिऊ नका
जास्तीत जास्त लोक थंड पाणी पिणं पसंत करतात. थंडपाणी पिणं रिफ्रेशिंग वाटत असलं तरी यामुळे तुमच्या पचनक्रियेवर परीणाम होतो. यामुळे मांसपेशीत वेदना होऊ शकतात. म्हणून रुम टेम्परेचरवरचं पाणी प्या. जर तुम्ही कोमट पाणी प्यायलात तब्येतीसाठी उत्तम ठरेल.
घाईघाईत पाणी पिऊ नका
जर तुम्ही घाईघाईत पाणी पित असाल तर इनडायजेशन आणि ब्लोटींगचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच पाणी छोट्या छोट्या घोटांमध्ये प्या. शरीर प्रॉपर हायड्रेट ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.
जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणं
जर तुम्ही जेवताना जास्त पाणी पित असाल तर हे तुमच्या डायजेस्टीव्ह ज्यूसस डायल्यूट करते. यामुळेच अन्न पचणं कठीण होऊ शकतं. जेवल्यानंतर कमी कमी अर्धा तासानं पाणी प्या. यामुळे डायजेशन योग्य राहील आणि शरीरसुद्धा हायड्रेट राहील.