उन्हाळा सुरू होताच, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये (Digestive System) अनेक बदल घडतात. बऱ्याचदा खाल्लेलं अन्न लवकर पचत नाही. किंवा पचनशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे पोटाचे विकार, उलट्या, मळमळ, खाल्लेलं वेळेवर न पचने, यासह इतर समस्या निर्माण होतात. उन्हाळ्याच्या दिवसात आपण बर्फाळ आणि मसालेदार पदार्थ अधिक प्रमाणात खातो. थकवा, उष्माघात, शरीरात पाण्याचे प्रमाण वाढणे, यासह इतर समस्यांमुळे पचनसंस्थेच्या विविध समस्या उद्भवू शकतात (Digestion Problems). किंवा पाण्याच्या खराब गुणवत्तेमुळेही पचनसंस्थेचे आरोग्य बिघडते.
या दिवसात पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी साधा आणि हलका आहार घ्यावा (Health Care). उन्हाळ्यात पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी काय करावे? यासाठी स्वामी योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा(Ayurvedic Treatment for Digestion | Swami Ramdev).
उन्हाळ्यात पचनसंस्था मजबूत करण्यासाठी नियमित फॉलो करा काही टिप्स
- सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर कोमट पाणी प्या.
- बाहेरचे पदार्थ शक्यतो खाणं टाळा.
- पाणी नेहमी कोमट करून प्या. थंड फ्रिजमधले पाणी पिणे टाळा.
- रात्री झोपण्याच्या २ तास आधी डिनर करा. शिवाय हलका आहार घ्या.
पोटाचे विकार दूर करण्यासाठी उपाय
प्रसूतीनंतर वाढलेलं वजन-ओटीपोट कमीच होईना? 'या' फुलांच्या पाण्याने अंग शेका; वेट लॉससाठी उत्तम
- बऱ्याचदा खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसेस, पोट फुगणे, यासह इतर पोटाचे इतर विकार छळतात. यावर उपाय म्हणून काही फळांचे आहारात समावेश करू शकता.
- जसे की, पपई, सफरचंद, डाळिंब, नाशपाती, पेरू, संत्री यासह इतर पाणीदार फळे खाऊ शकता.
- जर आपल्याला पोटाच्या विकारांचा त्रास असेल तर, जेवल्यानंतर नियमित बडीशेप खा.
- सकाळी जर आपले पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर, उकळत्या पाण्यात प्रत्येकी चमचाभर जिरे, धणे आणि बडीशेप उकळवून, नंतर कोमट करून पाणी प्या.
- जेवल्यानंतर भाजलेले आले खा.
अॅसिडिटीवर घरगुती उपाय
- जर जेवल्यानंतर वारंवार आंबट ढेकर येत असतील तर, दुधीभोपळा आणि तुळशीचा रस प्या.
- बेलाच्या पानांचा ज्यूस प्या.
- मोड आलेले मेथी दाणे खा. यामुळे पोटाचे विकार, केसांचे आरोग्य आणि वजन कमी करण्यास मदत होईल.
- जर आपल्याला अॅसिडिटीचा वारंवार त्रास होत असेल तर, उकळत्या पाण्यात मेथी दाणे घालून त्याचा चहा तयार करून प्या.
- जेवण नेहमी अधिक वेळ चावून खावे.
आतडे मजबूत करण्यासाठी उपाय
वजन कमी करणं कठीण वाटतं? हळद आणि आल्याचा करा जबरदस्त उपाय; डाएट-जिमशिवाय घटेल वजन
- निरोगी आतडे राखण्यासाठी आपण आहारात पालेभाज्यांचा समावेश करू शकता. त्यात फायबरसह खनिजे आणि पोषकघटक आढळतात.
- यासह आपण रोज एक पेस्ट खाऊ शकता. यासाठी मिक्सरच्या भांड्यात गुलाबाची पाने, बडीशेप, वेलची आणि मध घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट दररोज एक चमचा खा.
खराब पचनसंस्थेवर उपाय
- जर खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल तर, नियमित एक आयुर्वेदिक पेय प्या.
- यासाठी ग्लासभर पाण्यात चमचाभर जिरे, धणे, बडीशेप, मेथी दाणे, ओवा घालून मिक्स करा, व पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
- सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी नियमित प्या. आपण हे पाणी नियमित ११ दिवस पिऊ शकता. यामुळे पचनसंस्था मजबूत होईल.
शरीर हायड्रेट आणि निरोगी राखण्यासाठी प्या 'या' फळांचा रस
- गजर, बीटरूट, दुधीभोपळा, डाळिंब आणि सफरचंदाचा रस तयार करून प्या.