Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Rare Laughing Disease अनुष्का शेट्टीला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार; उगाचच हसण्याचा हा आजार नेमका असतो काय?

Rare Laughing Disease अनुष्का शेट्टीला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार; उगाचच हसण्याचा हा आजार नेमका असतो काय?

‘Baahubali’s’ Anushka Shetty suffers from rare laughing disease. What is it? : कुणाला हसण्याचा आजार असेल अशी कल्पना तरी आपण करतो का? पण अनुष्का शेट्टीला तसा आजार झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 01:37 PM2024-06-26T13:37:51+5:302024-06-27T12:41:54+5:30

‘Baahubali’s’ Anushka Shetty suffers from rare laughing disease. What is it? : कुणाला हसण्याचा आजार असेल अशी कल्पना तरी आपण करतो का? पण अनुष्का शेट्टीला तसा आजार झाला आहे.

‘Baahubali’s’ Anushka Shetty suffers from rare laughing disease. What is it? | Rare Laughing Disease अनुष्का शेट्टीला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार; उगाचच हसण्याचा हा आजार नेमका असतो काय?

Rare Laughing Disease अनुष्का शेट्टीला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार; उगाचच हसण्याचा हा आजार नेमका असतो काय?

"हसना भी जरुरी है", आयुष्यात खळखळून हसा असे अनेक तज्ज्ञ सांगतात (Bahubali Fame). हसण्याने अनेक आजार दूर होतात. आपल्याला मानसिक त्रास होत नाही. काही जण हसण्यासाठी लाफिंग क्लब देखील जॉइन करतात (Anushka Shetty). हसल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. तसंच डोपामाइन आणि एंडोर्फिनची पातळी वाढून मनस्थिती सुधारण्यास मदत होते.

हसण्याने आयुष्य वाढते म्हणतात पण हसणे हाच आजार असेल तर? असाच एक विचित्र आजार बाहूबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीला झाला आहे. हसण्याचा आजार काय असतो पाहा.. (Anushka Shetty suffering from a rare neurological condition, pseudobulbar affect, referred to as 'laughing disease).

हसत राहण्याचा आजार म्हणजे काय?

साऊथ सिनेसृष्टीत आपल्या अभिनयातून मनामनात घर निर्माण करणारी अनुष्का शेट्टी, एका दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. या आजारामध्ये व्यक्ती आपोआप हसते किंवा रडते. अनुष्काने नुकतेच एका मुलखतीत सांगितले की, 'मला हसण्याचा आजार आहे. हसणे ही माझ्यासाठी ए क समस्या आहे. कॉमेडी सीन पाहताना किंवा शूटिंग करताना मी १५ ते २० मिनिटे हसते. हसताना ती जमिनीवर लोळते. ज्यामुळे शुटींग बऱ्याचदा थांबवावे लागते.'

व्यायामाला वेळ नाही-तोंडावरही ताबा नाही? झोपण्यापूर्वी ५ गोष्टी करा; काही न करता वजन घटेल

हसण्याच्या या आजाराला स्यूडोबुलबार इफेक्ट म्हणून ओळखलं जातं. ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल अवस्था आहे. त्याचा मेंदूवर परिणाम करते. हा आजार असलेली व्यक्ती उगाचच हसते, तिच्याही नकळत अनियंत्रित हसते किंवा रडते. स्यूडोबुलबार इफेक्ट हा मज्जासंस्थेसंबंधीचा विकार असून यात स्ट्रोक, मल्टिपल स्क्लेरोसिस, अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस, मेंदूला दुखापत आणि अल्झायमर होण्याचीही शक्यता असते.

स्यूडोबुलबारची काही लक्षणं

स्यूडोबुलबार लक्षणांमध्ये बरेचदा बदल होतात. या आजारामध्ये व्यक्ती एखाद्या दुःखद प्रसंगावर हसते किंवा एखाद्या मजेदार परिस्थितीत रडते. व्यक्ती एकाच वेळी रडूही शकते आणि कित्येक मिनिटांपर्यंत हसूही शकते. अशा लोकांना एन्झायटी आणि नैराश्याचाही त्रास होतो.

एकेकाळी तिचं ९५ किलो वजन होतं, सोनाक्षी सिन्हाने ३० किलो वजन घटवलं, वाचा कसं..

स्यूडोबुलबारवर उपचार कसा केला जातो?

पीबीएच्या उपचारांमध्ये, तज्ज्ञ काही औषधं देतात. या आजारावर नैराश्याच्या औषधांनीही उपचार करण्यात येतो. यावर उपाय म्हणून काहीजण मेटिटेशनही करतात. योग्य उपचार तज्ज्ञांच्या मदतीनेच करावे लागतात.

Web Title: ‘Baahubali’s’ Anushka Shetty suffers from rare laughing disease. What is it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.