Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ॲसिडीटीवर त्वरीत आराम देतील रामदेव बाबांचे ७ उपाय, पचनाचे विकार राहतील लांब

ॲसिडीटीवर त्वरीत आराम देतील रामदेव बाबांचे ७ उपाय, पचनाचे विकार राहतील लांब

Baba Ramdev shares a home remedies for acidity : योगगुरू बाबा रामदेव यांनी ॲसिडीटीला दूर ठेवण्याचे काही उपाय योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 11:33 AM2023-06-13T11:33:47+5:302023-06-13T14:39:58+5:30

Baba Ramdev shares a home remedies for acidity : योगगुरू बाबा रामदेव यांनी ॲसिडीटीला दूर ठेवण्याचे काही उपाय योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितले आहेत.

Baba Ramdev shares a home remedies for acidity : How can I cure acidity fast at home | ॲसिडीटीवर त्वरीत आराम देतील रामदेव बाबांचे ७ उपाय, पचनाचे विकार राहतील लांब

ॲसिडीटीवर त्वरीत आराम देतील रामदेव बाबांचे ७ उपाय, पचनाचे विकार राहतील लांब

जेवणाच्या वेळा चुकल्या, खाण्यात तिखट पदार्थ आले की लगेच ॲसिडीटी होते. ॲसिडीटी झाल्यानंतर छातीत जळजळ,  पोटात वेदना जाणवतात किंवा आंबट ढेकर येतात. (Swami Ramdev shares home remedies for acidity) यामुळे पोट  फुगणं, आंबट ढेकर येणं, श्वासांची दुर्गंधी, जडपणा जाणवणं ही लक्षणं दिसून येतात. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. ॲसिडीटीला दूर ठेवण्याचे काही उपाय योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितले आहेत. (Yog Guru Baba Ramdev shares a home remedies for acidity)

१) एक ग्लास गरम पाण्यात १ चमचा बडीशेप पावडर घालून प्यायल्यानं छातीत जळजळ, पोट फुगणं, पचनाचे विकार दूर होण्यास मदत होते. एक ग्लास पाण्यात १ चमचा जीरं  उकळून प्यायल्यानं एसिडिटीपासून आराम मिळतो.  पाण्यात लिंबू आणि सैंधव मीठ मिसळून प्यायल्यास अधिकाधिक फायदे मिळतात. त्यानंतर तुम्ही ५ मिनिटांसाठी स्ट्रेचिंग करू शकता. (How can I cure acidity fast at home)

२) याव्यतिरिक्त तुम्ही आपल्या आहारात फ्रूट डाएट म्हणजे पपई, सफरचंद, पिअर या पदार्थांचा समावेश करू शकता.गाजर, बीट, आवळा, पालक, टोमॅटो या पदार्थांचा रस प्यायल्यास पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी गुलाबाची पानं, बडिशेप, वेलची,  मध हे पदार्थ वाटून पेस्ट तयार करा आणि रोज एक चमचा याचे सेवन करा.

३) दूधी, तुळस आणि बेलाचा रस प्यायला सुरूवात करा यामुळे तब्येतीला अधिकाधिक फायदे मिळतील. मोड आलेली कडधान्य, त्रिफळा चूर्ण खाल्ल्यास तब्येतीला अधिकाधिक फायदे मिळतात 

४) सुका मेवा, अंजिर, मनुके, खाल्ल्यानं पोटाचे आरोग्य चांगले राहते. हे उपाय पोटाचे आरोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात.

५) ॲपल सायडर व्हिनेगर तब्येतीच्या समस्यांवर गुणकारी ठरतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी ॲपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून प्यायल्यानं ॲसिडीटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. 

६) जर तुम्हाला आतड्यांच्या संबंधित समस्या असतील गुलाबाची पानं, वेलची, मध यांची पेस्ट तयार करा. रोज एक चमचा या पेस्टचे सेवन केल्यानं आतडे मजबूत राहण्यास मदत होईल.

७) जर तुम्हाला एसिडिटीचा त्रास होत असेल तर रोज बडिशेप चावून खा. याव्यतिरिक्त तुम्ही जीरं, धणे, बडिशेपेच्या पाण्याचं सेवन करू शकता. जेवल्यानंतर भाजलेल्या आल्याचं सेवन केल्यास जेवण सहज पचण्यास मदत होते.

Web Title: Baba Ramdev shares a home remedies for acidity : How can I cure acidity fast at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.