Join us   

शाळा उघडली की मुलांना खायला द्या ४ पदार्थ, मुलांचं अभ्यासात लागेल लक्ष-वाढेल एकाग्रता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 3:31 PM

Baby brain food: 4 foods to fuel brain development : हे ४ पदार्थ मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी महत्वाचे आहेत; कारण..

आपली मुलं हुशार असावी, मुलांची बुद्धी तल्लख असावी प्रत्येक पालकाला वाटत असते (Memory Food). पण त्यासाठी नेमकं काय करावं असा प्रश्न निर्माण होतो? मुलं पौष्टीक पदार्थ खाताना नाकं मुरडतात (Brain Power). पण त्यातील पौष्टीक गुणधर्मांमुळेच मुलांच्या आरोग्याला फायदा होतो, शिवाय मुलांची बुद्धी तल्लख होते (Health Tips).

आता काही दिवसात शाळा सुरु होईल, काही भागांमध्ये शाळा सुरुही झाल्या असतील. शालेय शिक्षणामध्ये मुलांचे मन रमावे, शिवाय अभ्यास केलेलं लक्षात राहावे म्हणून मुलांना ५ गोष्टी खायला द्या. यामुळे मेंदूच्या विकासात वाढ होईल. शिवाय आरोग्यही सुधारेल(Baby brain food: 4 foods to fuel brain development).

मुलांच्या मेंदूच्या आरोग्याला चालना देणारे पदार्थ

पिनट बटर

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 'मुलांना रोज पिनट बटर खायला द्यावे. त्यात व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडेंट असतात. जे मज्जासंस्था आणि मेंदूला योग्यरित्या योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. आपण पिनट बटर चपाती, सँडविच, परांठा इत्यादींवर लावून खाऊ शकता.

रंगीबेरंगी भाज्या आणि फळे

मुलांच्या आहारात रंगीबेरंगी भाज्या आणि फळांचा समावेश करा. त्यात वांगी, गाजर, टोमॅटो, लेडीफिंगर, बीन्स, बेरी अशा सर्व प्रकारच्या भाज्या असाव्यात. या भाज्यांमध्ये असलेले पोषक तत्व मेंदूला निरोगी ठेवतात. तसेच रंगीबेरंगी फळांपासून शरीराला अनेक फायदे मिळतात.

चहासोबत कधीही खाऊ नका ५ गोष्टी; अपचन वाढेल कारण तब्येतीसाठी ‘हा’ पदार्थ अतिशयक घातक

ओट्स

वेट लॉससाठी लोक ओट्स खातात. तर काही फिट राहण्यासाठी नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करतात. पण आपण ओट्स मुलांनाही खायला देऊ शकता. ओट्समधील पौष्टीक घटक मेंदूचे कार्य सुधारते. शिवाय ओमेगा-३ युक्त धान्य खाल्ल्याने मेंदू निरोगी राहते.

मान्सूनचं आगमन होताच मुलं आजारी पडतात? ४ हेल्दी पदार्थ; इम्युनिटी होईल बुस्ट - ताकद वाढेल..

दही

प्रोटीन पॅक दही, मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.  दह्यामध्ये आयोडीन असते जे मेंदूच्या कार्यामध्ये प्रभावीपणे मदत करते. दह्यामध्ये प्रथिने, झिंक, बी 12 आणि सेलेनियम देखील असतात जे मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे पोषक असतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यविद्यार्थीShalechi Taiyari