Join us   

तोंडाला सतत दुर्गंधी येते, फक्त टूथपेस्ट बदलून उपयोग नाही; मोठया आजाराची लक्षणंही असू शकतात, तपासा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 12:27 PM

Bad breath : कितीही चांगल्या पद्धतीने ब्रश केलं तरी तोंडाची दुर्गंधी (hygiene issue) काही जात नाही? मग तुमचं काही तरी चुकतंय. तोंडाला सतत दुर्गंध येणं हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षणही असू शकतं....

ठळक मुद्दे खाण्यापिण्याच्या काही चुकीच्या सवयींमुळेही तोंडाला दुर्गंधी येते.

तोंडाला दुर्गंधी येणं ही समस्या अनेकांना छळते. यामुळे दुसऱ्यांशी बोलण्याची, त्यांच्या जवळ जाण्याचीही मग लाज वाटू लागते. मुळात आपल्या तोंडाचा घाण वास येत आहे, हीच भावना खूप जास्त लाजिरवाणी आहे. या समस्येमुळे मग चारचौघात जाणेही नकोसे वाटू लागते आणि मग कॉन्फिडन्स डाऊन व्हायलाही फार वेळ लागत नाही. अशी वेळ स्वत:वर येऊ द्यायची नसेल, तर लवकरच या समस्येचे मुळ कारण शोधून (what are the causes of bad breath?) त्यावर योग्य उपचार करणं गरजेचं आहे.

 

तोंडाला सतत येणारी दुर्गंधी याविषयी सांगताना डॉ. अवी रामावत म्हणाले की तोंडाला दुर्गंधी येणं याचं कारण ९० टक्के केसेसमध्ये हेच असतं की दाताची, जिभेची स्वच्छता योग्य पद्धतीने न ठेवली जाणं. ५ टक्के केसेसमध्ये जर तुमच्या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काही दोष असतील, फुफ्फुसासंदर्भात तुम्हाला एखादा आजार असेल तर तोंडाला दुर्गंधी येते. तर उरलेल्या ५ टक्के रूग्णांमध्ये किडनीचा दोष, लिव्हरचा दोष आणि कर्करोगाची शक्यता ही तोंडाला दुर्गंध येण्याची कारणे असू शकतात. त्यामुळे असा त्रास सहन करणाऱ्या रूग्णांनी सगळ्यात आधी तर त्यांच्या दातांची आणि जिभेची व्यवस्थित स्वच्छता होते आहे की नाही, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. याशिवाय काही जण नकली दात, क्लिप्स, कॅप्स अशा गोष्टी वापरतात. या गोष्टींची नीट स्वच्छता न राखल्यानेही किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असल्यानेही तोंडाला दुर्गंधी येते.

 

तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून हे उपाय करा These are the solutions to reduce bad breath - तोंडाला दुर्गंधी येऊ नये यासाठी प्रत्येकाने दिवसातून दोन वेळा दोन- दोन मिनिटे ब्रश केले पाहिजे. - मुळात ब्रश करणं हे वरवर दाताची स्वच्छता करणं नाही. वरवर दात स्वच्छ, चमकदार दिसत असतील, पण दोन दातांच्या मध्ये जर काही साचून राहत असेल, तर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येणारच. त्यामुळे दोन दातांच्या मधल्या भागाची स्वच्छता होणं गरजेचं आहे. - ब्रश करण्यासाठी जेल प्रकारातल्या आणि नावाजलेल्या टुथपेस्टच (tooth paste) वापरा.

- तुमचा टुथब्रशही (tooth brush selection) चांगल्या दर्जाचा आणि मऊ असावा. दर तीन ते चार महिन्यांनी टुथब्रश बदलावा. - तोंडाला घाण वास येऊ नये, यासाठी जिभेची स्वच्छता करणेही खूप गरजेचं आहे. जीभ साफ करण्यासाठी स्वतंत्र ब्रश ठेवा किंवा मग टंग क्लिनरचा उपयोग करून नियमितपणे जीभ साफ करा. - ब्रश केल्यावर ४ ते ५ वेळा खळखळून गुळण्या कराव्या.  - दर सहा महिन्यातून एकदा डेंटिस्टकडे जावे आणि त्यांच्याकडून नियमितपणे इंटर डेंटल क्लिनिंग करून घ्यावे.

 

खाण्यापिण्याच्या सवयी बदला Eating habits may cause the bad breath - खाण्यापिण्याच्या काही चुकीच्या सवयींमुळेही तोंडाला दुर्गंधी येते. - त्यामुळे कच्चा लसूण, कच्चा कांदा खाणं तसेच तंबाखू, स्मोकिंग, अल्कोहोल सेवन या सवयी सोडा. - जेवण झाल्यानंतर काकडी, टोमॅटो, गाजर असं सॅलड खा. सॅलड तुमच्या दातांवर चिकटलेले अन्नपदार्थांचे कण स्वच्छ करण्यास मदत करतात. - जेवण झाल्यानंतर खळखळून चुळ भरण्यास विसरू नका.  - जेवण झाल्यानंतर ३ ते ४ मिनिटे शुगर फ्री च्युईंगम चघळल्यानेही तोंडाची दुर्गंधी कमी होते.  - माऊट वॉश किंवा फ्लेव्हर टुथपेस्ट वापरल्यानेही तोंडाची दुर्गंधी कमी होते. - भरपूर पाणी प्या. 

 

या लोकांनीही काळजी घ्यावी - जे लोक नकली दातांचा किंवा कवळीचा वापर करतात, त्यांनी रात्री झोपण्याआधी कवळी काढून ठेवावी.  - दुसऱ्यादिवशी एखादा सॉफ्ट शाम्पू किंवा टुथपेस्टचा वापर करून ती स्वच्छ करावी आणि त्यानंतरच तोंडात घालावी. - जे लोक क्लिप्स वापरतात किंवा ज्यांच्या दातांना फिक्स कॅप असते, त्यांनीही दिवसातून तीन ते चार वेळा तसेच प्रत्येक जेवणानंतर आणि रात्री झोपण्यापुर्वी व सकाळी ब्रश केल्यानंतर खळखळून चुळ भरावी.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सदातांची काळजी