Join us   

बॅड कोलेस्टेरॉल ते वेट लॉस : 'ही' दाक्षिणात्य पांढरी चटणी खाल्ल्याने शरीराला मिळतील ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2024 1:44 PM

Bad Cholesterol to Weight Loss: 5 Benefits of Eating 'This' White Chutney : दाक्षिणात्य भागात 'ही' चटणी आवर्जून खाल्ली जाते; ज्याने पचन सुधारते आणि..

भारतीय जेवणात नारळाच्या चटणीला (Coconut Chutney) विशेष महत्व आहे. मुख्यतः ही चटणी दक्षिण भागात तयार केली जाते. शिवाय महाराष्ट्रातही खोबऱ्याचा वापर बऱ्याच पदार्थांमध्ये होतो. खोबऱ्याचा वापर पदार्थांमध्ये करताच सुगंध आणि चव दोन्ही वाढते (Health Benefits). पण ही स्वदिष्ट चटणी फक्त चवीसाठी नसून, आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

आहारतज्ज्ञ शिखा शर्मा यांच्या मते, 'खोबऱ्याची चटणी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. खोबरं आणि इतर पौष्टीक गोष्टींचा वापर करून तयार करण्यात आलेली ही चटणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते (Immunity Boost). शिवाय रक्तदाब नियंत्रित करणे, कोलेस्टेरॉल कमी करणे (Bad Cholesterol), पचन सुधारणे, यासह पोटाचे विकार दूर ठेवण्यास मदत करते. पण त्यात सॅच्युरेटेड फॅट असल्याने ते जास्त प्रमाणात खाऊ नये'(Bad Cholesterol to Weight Loss: 5 Benefits of Eating 'This' White Chutney).

खोबऱ्याची चटणी खाण्याचे फायदे

पचन सुधारते

खोबऱ्याच्या चटणीमध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. खोबऱ्याची चटणी खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर राहतात. याशिवाय पोटातील हानिकारक बॅक्टेरिया साफ करण्यासही मदत होते.

शंभरीच्या उंबरठ्यावर महिलेला मिळालं अमेरिकन नागरिकत्व, अमेरिकन ड्रिमची ‘अशी’ही गोष्ट

रोगप्रतिकार शक्ती मजबूत आणि ब्लडप्रेशर नियंत्रित राहते

खोबऱ्याच्या चटणीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे शरीरातील खराब बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करतात. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नारळाची चटणी नियमित खावी. त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

कोलेस्टेरॉल कमी होते, हृदय निरोगी राहते

खोबऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण १३.६ ग्रॅम इतके असते. जे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते. याच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

एका दिवसात जास्तीत जास्त किती साखर खावी? शरीराला किती साखरेची गरज असते?

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

खोबऱ्याची चटणी खाल्ल्याने इन्शुलीनची क्रिया सुधारते. त्यामुळे मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी ही चटणी फायदेशीर ठरते. ही चटणी नियमित खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

वेट लॉससाठी मदत

खोबऱ्याची चटणी चयापचय गती वाढवण्यास मदत करते. यामुळे, शरीर पोषक तत्वांचा अधिक चांगला वापर करते. ज्यामुळे आपल्या शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. शिवाय चयापचय क्रिया बुस्ट झाल्याने वजन कमी करण्यासही मदत होते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य