Join us   

थंडीत आवर्जून खा बाजरीची पौष्टीक भाकरी; ५ गुणकारी फायदे-भाकरी करण्याची परफेक्ट पद्धत, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 11:19 AM

Bajra Roti Eating Benefits in Winter : (Bajrichi Bhakri Khanyache Fayde) शरीरात बॅड कोलेस्टेरॉल जमा होऊ नये यासाठी तुम्ही  बाजरीची भाकरी खाऊ शकता. शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर लवकरात लवकर ही भाकरी खाणं सुरू करा. 

थंडीच्या (Winter) दिवसांत बाजरी भाकरी खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. बाजरीची भाकरी आणि ठेचा हे अनेकांचे फेव्हरेट फूड आहे. (Benefits of Consuming Bajra in Winters) बाजरीची भाकरी फक्त चवीसाठी नाही तर चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बाजरीत फायबर्स, अमिनो एसिड्सचे प्रमाण जास्त असते. यातील पोषक तत्वांचा आपल्या आहारात समावेश केल्यास आजारांपासून दूर होण्यास मदत होईल. (Bajra Roti Eating Benefits)

हेल्थ लाईनच्या रिपोर्टनुसार बाजरीत २०१ कॅलरीज,  ६ ग्राम प्रोटीन, १.७  ग्राम फॅट्स, ४० ग्राम कार्ब्स असतात. आयर्नचे प्रमाण ६ टक्के असते. (Bajra Roti Eating Benefits) बाजरीच्या खिचडीबरोबर दलियाचेही सेवन करू शकता. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.

बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला काय फायदे मिळतात? (Benefits of Bajra and Easy to include it in your winter diet)

१)  मेडिकव्हर हॉल्पिटलच्या रिपोर्टनुसार बाजरीची भाकरी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली  जाते. बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे शरीराबरोबरच हृदयाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. 

२) बाजरी डायबिटीसच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरते. बाजरीतील पोषक तत्व डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. आठवड्यातून २ ते ३ दिवस बाजरीची भाकरी खाल्ल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.

३) वजन कमी करण्यासाठी आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. बाजरीत फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. बाजरीची भाकरी खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.  पचन क्रिया चांगली राहण्यासाठी बाजरी फायदेशीर ठरते.  बाजरीची भाकरी खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि पचनाचे विकार दूर होण्यास मदत होते. 

थंडीत रोज चपातीबरोबर १ गुळाचा खडा खा, हाडं होतील बळकट-हिमोग्लोबिन भरपूर वाढेल

४) यातील पोषक तत्व  सुरकुत्या कमी करतात आणि  चेहऱ्यावर चमक येण्यासही मदत होते. नियमित याचे सेवन केल्यास एजिंग साईन्सही कमी होतात.  जर तुम्हाला हायपर टेंशनचा त्रास होत असेल तर  बाजरीची भाकरी खाणं फायदेशीर ठरू शकतं. यात मॅग्नेशियम असते. ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

५) शरीरात बॅड कोलेस्टेरॉल जमा होऊ नये यासाठी तुम्ही  बाजरीची भाकरी खाऊ शकता. शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर लवकरात लवकर ही भाकरी खाणं सुरू करा. 

उरलेल्या भाताचा करा क्रिस्पी-टेस्टी डोसा; ५ मिनिटांत बनेल डोसा-फोडणीचा भात करणंच विसराल

जर तुम्ही बाजरीची भाकरी खाणं  सुरू केलं तर रोगप्रतिकारकशक्ती वाढेल आणि संक्रमणापासूही बचाव होईल. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही शरीराला गरम ठेवण्यासाठी चपात्यांचे सेवन करू सकता. यामुळे सर्दी-खोकल्या यांसारख्या एलर्जीक रिएक्शन्स होणार नाहीत.  

बाजरीची भाकरी करण्याचो सोपी पद्धत (Bajrichi bhakri kashi banvaychi)

बाजरीची भाकरी करण्यासाठी पीठ दळताना ते जास्त बारीक किंवा घट्ट नको. पीठ मळण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. जेणेकरून भाकरी तुटणार नाही. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला ऊब मिळेल आणि तब्येतीचे त्रासही उद्भवणार नाहीत. 

टॅग्स : अन्नआरोग्यकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.थंडीत त्वचेची काळजी