दात पिवळे (Yellow Teeth) पडणं ही एक कॉमन समस्या आहे, ज्यामुळे आपल्या हास्यावर परिणाम होतो. इतकंच नाही तर जे लोक रोज ब्रश करतात त्यांचे दातही पिवळे झालेले दिसून येतात. (Banana Peel With Baking Soda) दात पिवळे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. अनेक लोक या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्सचा आधार घेतात. जर तुम्ही नैसर्गिक उपायांनी या समस्येपासून सुटका मिळवू इच्छित असाल तर तुम्ही सोप्या घरगुती उपायांचा आधार घेऊ शकता. (Banana Peel With Baking Soda to Get White Teeth Quickly Effective Home Remedy For Yellow Teeth)
केळी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असे फळ आहे. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, यांसारखी पोषक तत्व असतात ज्यामुळे दात पांढरे होण्यास मदत होते. केळ्याच्या सालीत योग्य पदार्थ मिसळून दातांना लावले तर याचे दुप्पट फायदे मिळतील.
पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय
केळ्याचे साल
बेकींग सोडा
लिंबाचा रस
एक ताजी केळी घ्या आणि त्याचं साल काढून घ्या, सालीचा आतला भाग दातांवर रगडून स्वच्छ करा, जवळपास २ ते ३ मिनिटं हा उपाय करा. नंतर १ चमचा बेकींग सोडा घ्या त्यात काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण एका पेस्टप्रमाणे बनेल. ही पेस्ट ब्रशच्या मदतीनं दातांवर लावा नंतर हलक्या हातानं ब्रश करा. काही मिनिटांनी साध्या पाण्यानं गुळण्या करा.
केळ्याचे साल आणि त्यातील मिनरल्स दातांवर जमा घालेली घाण आणि पिवळेपणा हटवण्यास मदत करतात. बेकिंग सोडा एक प्राकृतिक व्हाईटनर आहे, ज्यामुळे डाग निघून दात पांढरे होण्यास मदत होते. लिंबाच्या रसात प्राकृतिक एसिड असते ज्यामुळे दातांवर जमा झालेला थर निघून जातो आणि दात चमकदार दिसण्यास मदत होते.
वयाच्या साठीतही मिलिंद सोमण दिसतात हॉट, प्रोटीनसाठी खातात घरी बनवलेला ‘हा’ पदार्थ
हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा पेक्षा जास्त वेळ करू नका कारण जास्त लिंबाचा वापर केल्यास दातांच्या इनॅमलवर नुकसान पोहोचू शकते. नेहमी ताज्या केळीच्या सालीचा वापर करा. हा उपाय केल्यानंतर साध्या टुथपेस्टनं ब्रश करा. जेणेकरून तोंड व्यवस्थित साफ होईल.
या घरगुती उपायाचे फायदे
हा पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे. यात कोणत्याही प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जात नाही. हा एक स्वस्त आणि सोपा घरगुती उपाय आहे. नियमित हा उपाय केल्यानंस दात चमकदार आणि पांढरे दिसतील. जास्त खर्च न करता तुम्ही केळीच्या सालीनं सुंदर हास्य मिळवू शकता.