Join us   

रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? १० वाजता झोपल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2023 2:04 PM

Bedtime Between 10 p.m. and 11 p.m. Best for Health रात्री कितीला झोपता, यावर ठरतं तुमचं आरोग्य कसं राहील, १० वाजता झोपण्याचे फायदे पाहा..

सध्याच्या काळात असा क्वचितच कोणीतरी सापडेल, जो रात्री १० वाजताच गाढ झोपेल. काहींना मोबाईल फोनवर चॅट किंवा रील्स स्क्रोल केल्याशिवाय झोपच लागत नाही. उत्तम आरोग्यासाठी शरीराला ८ तासांची झोप आवश्यक. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या निगडीत ही समस्या आणखी वाढत जाते. सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे, चिडचिड, थकवा, सुजलेले डोळे आणि आळशीपणा जाणवतो. संपूर्ण दिवस आळसात जातो. यासाठी रात्री १० च्या आधी झोप घेणे आवश्यक आहे.

यासंदर्भात, होलिस्टिक हेल्थ अँड वेलनेस कोच श्वेता गुप्ता सांगतात, ''झोप आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. यासाठी वेळेवर झोपणे आवश्यक आहे. रात्री १० वाजता झोपल्याने शरीराची नैसर्गिक सर्कॅडियन लय चांगली झोप देते. रात्रीच्या सुरुवातीला गाढ झोप येते, ज्यामुळे हार्मोन्स बरोबर कार्य करतात. रात्री १० वाजता झोपल्याने सकाळी देखील लवकर जाग येते. ज्यामुळे संपूर्ण आनंदात जातो''(Bedtime Between 10 p.m. and 11 p.m. Best for Health).

मेंदू निरोगी राहतो

अपूर्ण झोपेमुळे मूड देखील खराब राहतो, संपूर्ण दिवस तणावाखाली जातो. तणावामुळे आपण मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही आजारी पडतो. तणाव टाळण्यासाठी, तणाव संप्रेरक म्हणजेच कॉर्टिसॉल नियंत्रित करणे आवश्यक आहे. यासाठी रात्रीची चांगली झोप घ्या.

पचनक्रिया उत्तम होते

वेळेवर झोपल्याने पचनक्रिया उत्तम राहते. दिवसा जे काही आपण खातो ते पचवण्यासाठी रात्रीची झोप आवश्यक असते.

लठ्ठपणा कमी होतो

रात्री लवकर झोपल्याने चयापचय क्रिया योग्यरीत्या चालते. ज्यामुळे दिवसभरात सेवन केलेल्या कॅलरीज झपाट्याने बर्न होतात. व शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळेच रात्री लवकर झोपणाऱ्या महिला अधिक तंदुरुस्त आणि निरोगी असतात.

उष्णता वाढली, जिभेला फोड आले आहेत? ५ घरगुती उपाय- आग आणि फोड होतील कमी

प्रतिकारशक्ती मजबूत होते

रात्री १० वाजता झोपल्याने आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढते. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. ज्यामुळे संसर्ग व इतर रोगांचा धोका कमी होतो.

हार्मोन्स नियंत्रणात राहतात

महिलांच्या आरोग्यासाठी इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि कॉर्टिसॉल यांसारखे हार्मोन्स नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. लवकर झोपल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळते, ज्यामुळे हार्मोन्स योग्यप्रकारे नियंत्रित राहते.

मुठभर काळ्या मनुका रोज खाण्याचे भरपूर फायदे, बेजार करणारे ४ आजारही राहतील दूर

सौंदर्य वाढते

त्वचेवर चमक येण्यासाठी शरीरात ब्लड फ्लो व ऑक्सिजन योग्यप्रकारे कार्य करणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे चेहरा थकलेला वाटतो. डोळ्यांवर सूज येते आणि काळी वर्तुळे दिसतात. ज्यामुळे चेहरा डल दिसतो. जेव्हा आपण लवकर झोपतो, तेव्हा चेहरा फ्रेश व टवटवीत दिसतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य