Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लठ्ठ झालात, वजन वाढलं हा फक्त शारीरिक आजार नाही; मानसिक आजारही असू शकतो, कारण..

लठ्ठ झालात, वजन वाढलं हा फक्त शारीरिक आजार नाही; मानसिक आजारही असू शकतो, कारण..

लठ्ठपणा केवळ शारीरिक आरोग्याशी निगडित समस्या नसून ती मानसिक आरोग्याशीही निगडित असल्याचं संशोधनातून सिध्द झालं आहे. लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्य बिघडतं आणि मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते असा हा परस्परसंबंध असल्यानं वाढलेल्या वजनाकडे गांभिर्यानं बघण्याचा सल्ला तज्ज्ञ आणि अभ्यासक देतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 07:57 PM2022-03-04T19:57:15+5:302022-03-04T20:27:00+5:30

लठ्ठपणा केवळ शारीरिक आरोग्याशी निगडित समस्या नसून ती मानसिक आरोग्याशीही निगडित असल्याचं संशोधनातून सिध्द झालं आहे. लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्य बिघडतं आणि मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते असा हा परस्परसंबंध असल्यानं वाढलेल्या वजनाकडे गांभिर्यानं बघण्याचा सल्ला तज्ज्ञ आणि अभ्यासक देतात.

Being obese, gaining weight is not just a physical illness; There may be mental illness, because .. | लठ्ठ झालात, वजन वाढलं हा फक्त शारीरिक आजार नाही; मानसिक आजारही असू शकतो, कारण..

लठ्ठ झालात, वजन वाढलं हा फक्त शारीरिक आजार नाही; मानसिक आजारही असू शकतो, कारण..

Highlightsलठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य यांच्यातली घनिष्ट मैत्री सांगणारं संशोधनही काळजी करण्यासारखं असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.मानसिक आरोग्याशी निगडित कोणतीही समस्या असू देत त्याचा परिणाम झोपेवर आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर होतोच. त्याचा परिणाम वजन वाढण्यावार होतो..लठ्ठपणामुळे एकटेपणा वाढतो आणि एकटेपणाचा खाण्या पिण्याच्या सवयींवर नकारात्मक परिणाम होतो . त्याचा परिणाम पुन्हा लठ्ठपणा वाढण्यावर होतो.

लठ्ठपणा म्हणजे वाढलेलं वजन, लठ्ठपणा म्हणजे चेष्टेचा विषय, लठ्ठपणा म्हणजे खात्या पित्या घरचे असल्याचा पुरावा नव्हे. आणि लठ्ठपणा म्हणजे दुर्लक्ष करण्याचाही विषय नाही. अनेक गंभीर आजारांचा, समस्यांचा धोका लठ्ठपणातून निर्माण होतो.लठठपणा ही जागतिक समस्या असून अमेरिका, चीन यानंतर भारतात या समस्येचं प्रमाण जास्त आढळून आलं आहे. ही समस्या सतत वाढत असल्याचं चित्रं विविध सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तसेच लठ्ठपणा  केवळ शारीरिक आरोग्याशी निगडित समस्या नसून ती मानसिक आरोग्याशीही निगडित असल्याचं संशोधनातून सिध्द झालं आहे. लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्य बिघडतं आणि मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते असा हा परस्परसंबंध असल्यानं वाढलेल्या वजनाकडे गांभिर्यानं बघण्याचा सल्ला तज्ज्ञ आणि अभ्यासक देतात. 

Image: Google

काय सांगतो सर्व्हे?

2021साली प्रसिध्द झालेला राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण  5 (एनएफएचएस-5 ) सांगतं की स्थूलता, लठ्ठपणा ही समस्या लहान मुलांसोबतच स्त्री पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. महिलांमधील स्थूलतेच्या समस्येचं प्रमाण 20.6 टक्क्क्यांवरुन ते 24 टक्क्यांपर्यंत वाढलेलं आहे.  लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य यांच्यातली घनिष्ट मैत्री सांगणारं संशोधनही काळजी करण्यासारखं असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. 

लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य

'इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर ॲण्ड अलाइड साइंसेज डिपार्टमेण्ट ऑफ सायकेस्ट्री ' चे प्रोफेसर डाॅ. ओमप्रकाश सांगतात, की खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, बैठी आणि अनियंत्रित जीवनशैली यामुळे  वजन वाढतं. याचसोबत मानसिक आरोग्याचाही लठ्ठपणा वाढण्यावर परिणाम होतो. तर लठ्ठपणा वाढण्याचा परिणाम मानसिक आरोग्य बिघडण्यावर होतो असं अभ्यासातून सिध्द झालं आहे. 

Image: Google

मानसिक अनारोग्यामुळे लठ्ठपणा वाढतो .. कसा  ?

1. तज्ज्ञ सांगतात ज्यांना भीती, तणाव, नैराश्य, बायपाॅलर डिसऑर्डर यासारख्या मानसिक समस्या असतात त्यांचं खाणं पिणं विस्कळित आणि अनियंत्रित असतं.  खाण्यापिण्याच्या अनियंत्रित सवयींमुळे वजन वाढतं. 

2. सेरोटोनिन या हॅपी हार्मोनच्या कमतरतेमुळे नैराश्य येतं. या अवस्थेत सतत काहीतरी खात राहावसं वाटतं. तसेच झ्पेशी निगडित समस्या असतील तर त्याचाही परिणाम भूकेवर होऊन सतत गोड, खारट, जंक फूड खाण्याची इच्छा होते. जास्त खाल्ल्यानं वजन वाढतं. 

3. मानसिक थकवा, व्यायाम करण्याचा मूड नसणं,  मानसिक तणाव या मानसिक समस्यांमुळे वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. 

Image: Google

लठ्ठपणाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?

1. लठ्ठपणामुळे जगण्याची गुणवत्ता घसरते. वाढत्या वजनामुळे नातेसंबंध बिघडतात. कामाच्या पातळीवरचा प्रभाव कमी होतो. आळशी, संथं असे शिक्के लठ्ठ व्यक्तींवर मारले जातात. लठ्ठपणामुळे सामाजिक जीवनात लठ्ठ व्यक्तीला इतर आणि ती व्यक्ती स्वत:ही स्वत:ला अनाकर्षक समजते. यातून नैराश्य वाढण्याचा,  समाजापासून वेगळं राहाण्याचा, एकटेपणा वाढण्याचा धोका निर्माण होतो. एकटेपणामुळे खाण्या पिण्याच्या सवयींवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पुन्हा लठ्ठपणा वाढण्यावर होतो. 

2. लठ्ठपणामुळे भीतीची भावना निर्माण होते. यामुळे स्वप्रतिमेवर परिणाम होतो. न्यूनगंड निर्माण होतो. लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक समस्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. 

Image: Google

3. लठ्ठपणाचा परिणाम स्वप्रतिमेवर होतो. न्यूनगंड, बाॅडी शेमिंगसारख्या सामाजिक मानसिक समस्या यातून निर्माण होतात. 

4. डाॅ. ओमप्रकाश  म्हणतात, की मानसिक आरोग्याशी निगडित कोणतीही समस्या असू देत त्याचा परिणाम झोपेवर आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर होतोच. त्याचा परिणाम वजन वाढण्यावार होतो. तसेच मानसिक समस्येंवर जे औषधोपचार होतात त्याचा परिणाम म्हणूनही वजन वाढतं. म्हणूनच तज्ज्ञ शारीरिक आणि मानसिक आरोग्याची एकत्रित काळजी घेतली तर लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य यांच्या परस्परसंबंधांचे दुष्परिणाम टाळता येणं शक्य आहे असं म्हणतात. 

Web Title: Being obese, gaining weight is not just a physical illness; There may be mental illness, because ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.