Join us   

बेलाचे सरबत, बेलाचा रस पिण्याचे ५ फायदे, बेलपत्र आरोग्यासाठीही फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 7:17 PM

Know the many health benefits of Bael Leaves रक्त शुद्ध करण्यापासून शरीर थंड ठेवण्यापर्यंत, बेलपानांच्या रसाचे हे आहेत जबरदस्त फायदे..

सर्वत्र, महाशिवरात्री या उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. या दिवशी भगवान शंकर यांची आराधना करून पूजा केली जाते. त्यांना बेलपत्र प्रिय आहे असे म्हटले जाते. बेलपत्राचा उपयोग भगवान शंकर यांच्या पूजेसाठी केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? बेलपत्र आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. बेलपत्राच्या सेवनाने शरीरातील अनेक आजार दूर होतात. बेलपानांचा रस करून प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते. त्यातील औषधी गुणधर्मांमुळे शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत मिळते.

वेब एमडी यांच्या वेबसाईटनुसार, ''बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि पौष्टिक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी1, बी6, बी12 इत्यादी आवश्यक गोष्टी आढळतात. या पानांपासून तयार रस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.''

अशक्तपणा दूर होते

शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी बेल पानांचा रस फायदेशीर ठरते. ज्या लोकांना रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणाची तक्रार असते, त्यांनी बेल पानाच्या रसाचे सेवन करावे. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बेल पानांपासून तयार रस मिसळून प्या. आपण हा रस नियमित देखील पिऊ शकता.

डायबिटिजसाठी फायदेशीर

डायबिटीसच्या रुग्णांसाठी बेलपानाचे रस रामबाण उपाय म्हणून काम करते. बेल पानाच्या रसाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्याचबरोबर बेल पानाचा रस इन्सुलिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देते. डायबिटीसच्या रुग्णांनी या रसाचे सेवन करण्यापूर्व डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक.

पचनसंस्था निरोगी राहते

बेल पानापासून तयार रसाचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. या रसाच्या सेवनामुळे आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर पडते. यासह पोट साफ करण्यास मदत होते. यासाठी बेल पानांच्या रसामध्ये मीठ आणि काळी मिरी मिसळून सेवन करा.

रक्त शुद्ध होते

बेलपत्रापासून तयार रसाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते. यासाठी बेलाच्या पानांचा रस काढा त्यात कोमट पाणी आणि मध मिसळा. हा रस नियमित देखील आपण पिऊ शकता. ज्यामुळे रक्त शुद्ध होते यासह शरीर निरोगी राहते.

केसगळती रोखते

केसगळती रोखण्यासाठीही बेलपत्राच्या रसाचे सेवन करू शकता. यासाठी रस कोमट पाण्यात मिसळून प्या. यामुळे केसांना आतून मजबुती मिळेल.

इतर समस्येवरही करते काम

बेलपत्राचे सेवन केल्याने शरीर थंड राहते. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने तोंड येणे, जळजळ यासारख्या समस्या दूर होतात. उन्हाळ्यामध्ये याचे सेवन करून उष्मघाताचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

टॅग्स : महाशिवरात्रीहेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल