Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटाची सुटलंय- दंड जाडजूड झाले? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, झरझर घटेल चरबी

पोटाची सुटलंय- दंड जाडजूड झाले? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, झरझर घटेल चरबी

Belly Fat Loss Tips By Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांनी काही आयुर्वेदीक उपाय सांगितले आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 11:49 AM2024-09-29T11:49:29+5:302024-09-29T11:53:54+5:30

Belly Fat Loss Tips By Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांनी काही आयुर्वेदीक उपाय सांगितले आहे.  

Belly Fat Affects Many Organs Like Liver Intestine Baba Ramdev Yoga Tips To Lose Belly Fat | पोटाची सुटलंय- दंड जाडजूड झाले? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, झरझर घटेल चरबी

पोटाची सुटलंय- दंड जाडजूड झाले? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, झरझर घटेल चरबी

जिममध्ये तासनतास घाम गाळल्यानंतरही लठ्ठपणा कमी होत नसेल तर हा तुमच्यासाठी चिंचेता विषय असू शकतो. कारण वजन वाढल्यामुळे डायबिटीज, कोलेस्टेरॉल, स्ट्रोक इतकंच नाही तर इन्फर्टिलिटी यांसारखे आजार उद्भवू शकतात (Belly Fat Loss Tips By Baba Ramdev).  योगगुरू बाबा रामदेव यांनी काही आयुर्वेदीक उपाय सांगितले आहे.  व्यक्तीनं हे उपाय केल्यास वजन कमी करणं खूपच सोपं होऊ शकतं. (Belly Fat Affects Many Organs Like Liver Intestine Baba Ramdev Yoga Tips To Lose Belly Fat)

बीएमआय किंवा बीएमआर फॉर्म्यूलानं तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता. बीएमआर म्हणजेच बॉडी राऊंडनेस इंडेक्स यात बीएमआयप्रमाणेच उंची, वजन मोजले जाते याशिवाय कंबर, हिप्सचा आकारही मोजला जातो. बेली फॅट किती आहे ते मोजले जाते. बेली फॅटमुळे आतडे, लिव्हरला नुकसान पोहोचते. यामुळे बेली फॅटमुळे १३ प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. 

रामदेव बाबा सांगतात की, नियमित दालचिनी गरम पाण्यात उकळून यात १ चमचा मध घालून प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. याच पद्धतीने १ चमचा त्रिफळा गरम पाण्यासोबत घेतल्यानं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन्सच्या रिपोर्टनुसार दालचिनीच्या सेवनानं वाढलेलं वजन कमी करण्यास मदत होते (Ref). दालचिनीच्या सप्लिमेंट्स घेतल्यानं ब्लड ग्लुकोज लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.  दालिचीनीचं पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म चांगला होतो आणि भूकही लागते. 

सकाळी लिंबू पाण्याचे सेवन

रामदेव बाबा सांगतात सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्यानं आपल्या शरीरातील एक्स्ट्रा फॅट हळू हळू कमी होते आणि वजन कमी होऊ लागते. शरीरातील फॅट बर्निंगसाठी हा आयुर्वेदीक उपचार आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. सॅलेड खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली राहते. खाल्ल्यानंतर तुम्ही सॅलेडचे सेवन करू शकता.  ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. खाल्ल्यानंतर सॅलेड खाल्ल्यानंतर ओव्हरइंटींगची समस्या टाळता येते. 

पोट सुटलं, मांड्या थुलथुलीत दिसतात? वापरा 5:2 चा वेट लॉस फॉर्म्यूला, वाढलेलं वजन चटकन उतरेल

रामदेव बाबा रात्रीच्या जेवणात  चपाती, भाती न खाण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो. या दोन्हींमध्ये हाय कॅलरीज असतात. ज्यामुळे शरीरात फॅट्स वाढू लागतात दोन्ही खाल्ल्यानंतर मेटाबॉलिझ्म स्लो होतो आणि लठ्ठपणा वाढू लागतो. उशीरा रात्रीचं जेवण केल्यानं शरीरातील बॉडी फॅट बर्न करण्याची क्षमता कमी होते परिणामी वजन वाढते. या सवयींमुळे ब्लड शुगर लेव्हलसुद्धा वाढते.  रामदेव बाबा रात्री ७ च्या आधी खाण्याचा सल्ला देतात.

Web Title: Belly Fat Affects Many Organs Like Liver Intestine Baba Ramdev Yoga Tips To Lose Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.