Join us   

आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आवळा रस प्या, केस गळणे ते डायबिटीस अनेक तक्रारींवर उत्तम उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 12:53 PM

Benefit of Amla Juice to get rid from Diabetes Cholesterol and Beauty problems: भरमसाठ औषधं आणि पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा सोपा घरगुती उपाय

ठळक मुद्दे आवळा बाजारात सहज उपलब्ध होणारे फळ आहे. नाहीच तर आपळ्याची पावडरही मिळते. भरमसाठी औषधे घेण्यापेक्षा पारंपरिक आयुर्वेदिक उपाय करणे केव्हाही चांगले.

डायबिटीस, कोलेस्टेरॉल, थायरॉइड यांसारख्या समस्या गेल्या काही वर्षांपासून अनेकांच्या जगण्याचा भाग झाल्या आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या या समस्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत असून कमी वयातही बरेच जण या समस्यांचा सामना करताना दिसतात. कोणत्याही समस्येवर औषधोपचार करणे आवश्यक असले तरी आयुर्वेदातील काही पारंपरिक उपाय आणि जीवनशैलीतील बदल आपल्याला रोजच्या आयुष्यात भेडसावणाऱ्या विविध गोष्टींपासून वाचवू शकतात. आवळा हे अतिशय उपयुक्त फळ असून आहारात आवळ्याचा नियमित समावेश करायला हवा असे आपण वारंवार ऐकतो. मात्र रोजच्या धावपळीत आपण ते पुन्हा विसरुन जातो Benefit of Amla Juice to get rid from Diabetes Cholesterol and Beauty problems . 

(Image : Google)

पण आयुर्वेदतज्ज्ञ डॉ दिक्षा भावसार सांगतात रोज न चुकता २० मिलीग्रॅम आवळ्याचा रस प्यायल्यास आपल्या अॅसिडीटी, थकवा यापासून ते डायबिटीस कोलेस्टोरॉलपर्यंतच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. इतकंच नाही तर केस गळती, निस्तेज त्वचा या सगळ्यांवर आवळा अतिशय गुणकारी असल्याचेही त्या आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्य माध्यमातून सांगतात. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेला आवळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. आपण अनेकदा आवळा कँडी, मारोवळा, आवळा सुपारी, आवळ्याचं लोणचं अशा विविध मार्गाने आपण आवळा खातो. मात्र आवळ्याचा रस नियमित घेतल्यास काय फायदा होतो याविषयी डॉ. भावसार सांगतात. 

१. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत 

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फायदा होतो. तसेच वजन कमी करण्यासाठी, डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि पचनाशी निगडीत तक्रारींवर आवळा अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे आवळा हे बहुगुणी फळ आहारात असायला हवे. 

२. पचनाशी निगडीत समस्या 

हवाबदल झाला की आपल्याला अनेकदा गॅसेस होणे, अपचन, अॅसिडीटी, बद्धकोष्ठता अशा समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र नियमितपणे आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास या समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होते. 

३. सौंदर्यासाठी फायदेशीर 

केस गळणे, चेहऱ्यावर काळे डाग येणे, पिंपल्स यांसारख्या समस्यांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते. यावर उपाय म्हणून आपण केमिकल प्रॉडक्ट वापरतो किंवा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट घेतो. पण नियमितपणे आहारात आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास या समस्या दूर होण्यास मदत होते.  आवळा अँटीएजिंग आणि अँटी ऑक्सिडंट असल्याने त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

४. डायबिटीस, कोलेस्टेरॉल व लिव्हरसाठी उपयुक्त

आवळ्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी तसेच अँटी डायबिटीक गुणधर्म असतात. त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास त्याचा चांगला फायदा होतो. आवळा हेपेटोप्रोटीव असल्याने लिव्हरचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. इतकेच नाही तर हायपोलिपिडेमिक असल्याने आवळ्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासही मदत होते. 

 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपाय