डिंक म्हटलं तर उष्णतेचा पदार्थ. हिवाळा सुरु झाला की, आपल्या आहारात डिंकाचे प्रमाण वाढते.(Goond Katira benefits for summer) डिंकाच्या लाडूपासून ते त्याच्या अनेक पदार्थांची चव आपण चाखतो. उन्हाळ्यात डिंक खाणे म्हणजे शरीरातील उष्णता वाढवून घेणे. परंतु, डिंकामध्ये देखील अनेक प्रकार आढळतात. ज्यातला एक गोंद कटिरा. सध्या सोशल मीडियावर याचा अधिक प्रमाणात ट्रेंड सुरु आहे. (How Goond Katira prevents dehydration)
उन्हाळा सुरु झाला की, डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी आपण काकडी, ज्यूस आणि इतर पेयांचा आपल्या आहारात समावेश करतो. (Goond Katira for skin hydration)परंतु, उष्माघात, त्वचेच्या समस्येवर आणि डिहायड्रेशनवर डिंक फायदेशीर ठरु शकते.शरीरातील पाण्याची कमरता भरुन काढण्यासाठी आपण हे डिंक खाऊ शकतो. (Natural ways to stay cool in summer)उन्हाळ्याच्या दिवसात आपले पोट थंड आणि निरोगी ठेवण्यासाठी अधिक मदत करते. याला चव नसली तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात गॅस-ॲसिडीटीमुळे मळमळ, छातीतही दुखते? ५ सोप्या टिप्स, अपचनाचे त्रास लगेच होतील कमी
1. उष्मघातापासून संरक्षण
डिंक हा नैसर्गिक आणि चिकट पदार्थ आहे. याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्याने ते जेलीसारखे तयार होते. आपण उन्हाळ्यात याचे सरबत किंवा दुधात मिसळून प्यायल्याने उष्माघातापासून आपले संरक्षण होईल.
2. पोटाला थंडावा मिळेल
डिंकामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमीन बी आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक घटक आढळतात. हे खाल्ल्याने आपल्या पोटाला थंड ठेवण्यास खूप मदत होते. सकाळी लवकर हे पाणी प्यायल्याने दिवसभर ऊर्जात्मक राहाता येते.
3. पोटाची चरबी कमी होते
उन्हाळ्यात आपल्याला सतत पाण्याची तहान लागते. अशावेळी आपल्या पोटात अन्न देखील जात नाही. अनेकदा वाढत्या वजनामुळे आणि पोटाच्या चरबीमुळे जीव नकोसा होतो. या काळात डिंक नियमितपणे खाल्ल्याने चरबी लवकर कमी होण्यास मदत होते. यात असणारे फायबर आणि पोषकतत्वामुळे पोट दिवसभर भरते. ज्यामुळे भूक कमी लागून चयापचय राखण्यासाठी फायदेशीर ठरतात.
4. डिहायड्रेशनची समस्या
डिंक पाण्यात भिजवून दररोज ते पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहाते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या टाळता येते. हे नियमितपणे खाल्ल्याने अपचन, अतिसार आणि चिडचिड यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.