कमकुवत हाडे (Bone Health) म्हणजे संपूर्ण शरीर कमकुवत होणे. आपल्या शरीरातील हाडं मजबूत असतील तर, इतर आजार आपल्याला छळणार नाहीत. हाडे आपल्या शरीराला आधार देण्यासाठी आणि त्याचे संतुलन राखण्यात मदत करतात. वयानुसार हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे वेळीच हाडं आणि आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हाडांची हवी तशी काळजी घ्यायला जमत नाही. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.
हाडांना फक्त कॅल्शियम नसून इतरही पौष्टीक घटकांची गरज असते. आपण ऐकलंच असेल, दूध प्यायल्याने हाडं मजबूत होतात. पण फक्त निरसं दूध नसून, त्यात सुके अंजीर घालून प्या. यामुळे हाडंच काय, इतर अवयवांना देखील फायदा होईल(Benefits of anjeer milk digestion and weight loss).
हाडांना फक्त दूध पुरेसं नाही
द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, 'दुधात कॅल्शियमसह इतर अनेक विशेष पोषक घटक आढळतात. जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण ज्यांना हाडांच्या निगडीत समस्या सतावतात, त्यांच्यासाठी फक्त दूध पुरेसं नाही. दुधासोबत सुके अंजीर खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. यामुळे शरीरातील उर्जा तर वाढेलच शिवाय हाडं मजबूत करण्यास मदत होईल.'
रसायनयुक्त गुळ कसा ओळखायचा? ३ टिप्स, गुळात भेसळ नाही हे सहज ओळखा..
दुधात उकळवून खा अंजीर
काही लोकांना निचळ दूध प्यायला आवडते. फक्त दूध पिण्यापेक्षा आपण त्यात सुके अंजीर घालून खाऊ शकता. जेव्हा आपण दूध गरम करण्यासाठी ठेवतो, तेव्हा त्यात सुके अंजीरचे तुकडे घाला. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. अंजीर दूध ग्लासमध्ये ओतून प्या. पण जर आपल्याला अंजीर खायला आवडत असेल तर, पहिले दूध प्या मग २-३ अंजीर खा.
सुके अंजीर खाण्याचे फायदे
अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे गुण आढळतात, जे हाडांची मजबूती टिकवून ठेवण्यास मदत करतात. शिवाय हाडांच्या तंदुरुस्तीसाठी मदत करतात.
सूर्यफुलाचं तेल वापरलं तर वाढलेलं वजन सरसर कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, तेलाचा इफेक्ट
डॉक्टरांचा सल्ला घ्या
फक्त पोषणच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ होत नसून, यामागे इतरही कारणं असू शकतात. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे बरेचसे आजार ग्रासतात. त्यामुळे जर हाडांचं दुखणं वाढत चाललं असेल तर, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेणं गरजेचं आहे.