तुरटी आणि हळद (Turmeric With Alum) अनेक घरांमध्ये वापरले जाते. दाढी केल्यानंतर शेव्हिंगसाठी तुरटीचा वापर केला जातो. तुरटी आणि हळदीचं मिश्रण फायदेशीर ठरतं. या दोन्हींमध्ये औषधी गुणधर्म असतात. अंघोळीच्या पाण्यात तुरटी घातल्यानं त्वचेच्या बऱ्याच समस्या टाळता येतात (Benefits Of Applying Turmeric With Alum). औषधी गुणांनी परिपूर्ण तुरटी वापरल्यानं त्वचा चांगली राहते. वेगवेगळ्या प्रकारे तुरटीचा वापर तुम्ही शरीरासाठी करू शकता. आयुर्वेद एक्सपर्ट्स डॉ. रितु चड्ढा यांनी तुरटीत हळद मिसळून लावण्याचे फायदे सांगितले आहेत. (Benefits Turmeric With Alum)
दातदुखीच्या वेदना दूर होतात
दातदुखीच्या वेदनांपासून आराम मिळव्यासाठी तुम्ही तुटरी आणि हळदीचा वापर करू शकता. यात एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे वेदना, सूज कमी करण्यास मदत होते. तुरटीच्या पाण्यात हळद आणि मिसळून या पाण्यानं गुळण्या केल्यानं वेदनांपासून आराम मिळतो.
जखम बरी होण्यास मदत होते
त्वचा कापली गेल्यानंतर किंवा जखम झाल्यानंतर तुरटी आणि हळदीचा लेप लावल्यास जखम भरण्यास मदत होते. याशिवाय स्किन इन्फेक्शनपासून बचाव होतो. जर तुम्हाला जास्त जखम झाली असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.
खोकल्यापासून आराम मिळतो
तुरटी आणि हळदीचे मिश्रण दमा आणि खोकल्यापासून आराम देते. तुरटीत एल्यूमिनियम, पोटॅशियम सल्फेट असते ज्यामुळे खोकला होत नाही. तुरटी हळदीच्या पाण्यात घालून या पाण्यानं गुळण्या केल्यानं छातीतला कफ मोकळा होतो आणि जास्त खोकला येत नाही.
गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना-पाय खूप दुखतात? ग्लासभर दुधात ४ पदार्थ घालून प्या; दुखणं होईल कमी
त्वचा ग्लोईंग दिसते
तुरटी आणि हळदीचे मिश्रण त्वचेसंबंधित समस्यांना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. याच्या वापरानं त्वचेवरील डाग, सुरकुत्या निघून जाण्यास मदत होते. हे मिश्रण नियमित त्वचेला लावल्यानं त्वचा निरोगी आणि ग्लोईंग दिसते.
गव्हाचं पीठ की रवा, जास्त पोषण कशातून मिळतं? वजन कमी करण्यासाठी काय खायचं, काय टाळायचं?
युरिन इन्फेक्शनपासून सुटका होते
तुरटी आणि हळदीचे मिश्रण युरिन इन्फेक्शनपासून लढण्यासाठी फायदेशीर ठरते. तुरटीच्या पाण्यात चुटकीभर हळद मिसळून तुम्ही प्रायव्हेट पार्ट्स स्वच्छ करू शकता. यामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका टाळता येतो.