Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे 5 फायदे, शांत झोपेसह रिलॅक्स होण्यासाठी सोपा उपाय

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे 5 फायदे, शांत झोपेसह रिलॅक्स होण्यासाठी सोपा उपाय

बाहेरुन थकून भागून आलेल्यांनीच रात्री झोपण्याआधी आंघोळ करणं ( benefits of bathing at night) फायद्याचं असतं असं नाही तर दिवसभर घरात असलेल्यांसाठीही रात्रीची आंघोळ महत्वाची (importance of bathing at night) असते आणि फायदेशीर ठरते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 05:23 PM2022-07-13T17:23:11+5:302022-07-13T17:30:24+5:30

बाहेरुन थकून भागून आलेल्यांनीच रात्री झोपण्याआधी आंघोळ करणं ( benefits of bathing at night) फायद्याचं असतं असं नाही तर दिवसभर घरात असलेल्यांसाठीही रात्रीची आंघोळ महत्वाची (importance of bathing at night) असते आणि फायदेशीर ठरते.

Benefits of bathing at night... Bathing at night is important for physical and mental health | रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे 5 फायदे, शांत झोपेसह रिलॅक्स होण्यासाठी सोपा उपाय

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे 5 फायदे, शांत झोपेसह रिलॅक्स होण्यासाठी सोपा उपाय

Highlightsत्वचा निरोगी राहाण्यासाठी रात्री आंघोळ करणं फायदेशीर ठरतं.शरीर आणि मनाला आलेला थकवा घालवण्यासाठी रात्री आंघोळ करणं फायदेशीर ठरतं. रात्री झोपण्याआधी आंघोळ केल्यास स्नायूदुखी, सांधेदुखीवर या समस्यांवर आराम मिळतो. 

आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोज आंघोळ करणं आवश्यक असतं. आंघोळीनं शरीरावरील मळ, घाण साफ होतो. शरीराचा थकवा दूर होतो. आळस दूर होतो. आंघोळीनं शरीरासोबत मनाचा थकवाही दूर होतो.  आंघोळ ही साधारण सकाळीच केली जाते. पण रात्री केलेली आंघोळ (bathing at night)  आरोग्य, त्वचा , मानसिक आरोग्य, झोप यासाठी फायदेशीर ठरते. केवळ बाहेरुन थकून भागून आलेल्यांनीच रात्री झोपण्याआधी आंघोळ करणं फायद्याचं असतं असं नाही तर दिवसभर घरात असलेल्यांसाठीही रात्रीची आंघोळ महत्वाची (importance of bathing at night)  असते आणि फायदेशीर ठरते. रात्री आंघोळ केल्यानं काय फायदे होतात हे समजून घेतल्यास रात्री झोपण्याआधी आंघोळ का करायला हवी याचं महत्व उमजेल. 'इंडियन डर्मेटोलाॅजी जर्नल'मध्ये प्रसिध्द झालेला एक अभ्यास अहवाल सांगतो की, रात्री आंघोळ केल्यानं  (benefits of bathing at night) सौंदर्य वाढतं, त्वचा घट्ट होते, कोमट पाण्यानं आंघोळ केल्यास स्नायुंना आराम मिळतो. शरीराचा थकवा दूर होतो. मायग्रेनच्या समस्येवरही रात्रीची आंघोळ फायदेशीर असून शरीरावरची सूजही कमी होते. 

Image: Google

रात्री झोपण्याआधी आंघोळ का करावी?

1. दिवसभर घाम, प्रदूषण यामुळे शरीरावर त्वचेस हानिकारक जिवाणू तयार होतात. यामुळे चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या, ॲलर्जी यासारख्या समस्या निर्माण होतात. झोपण्याआधी शरीरावरचा हा जिवाणुंमुळे निर्माण झालेला धोका काढून टाकणं आवश्यक असतं. तसेच दिवसभर चेहेऱ्यावर विविध ब्यूटी प्रोडक्टसचा वापर केलेला असतो. त्वचेच्या सुरक्षेसाठी झोपण्याआधी चेहेऱ्यावरुन ते काढून टाकणं आवश्यक असतं. त्वचा निरोगी राहाण्यासाठी रात्री आंघोळ करणं फायदेशीर ठरतं. 

2. दिवसभरच्या कामानं, पळापळीनं रात्री थकवा येतो. तसेच जे लोकं दिवसभर कम्प्यूटर समोर बसून काम करतात त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. थकवा आलेला असूनही झोपेची समस्या निर्माण  होते. रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यानं आंघोळ केल्यास शरीर आणि मनाला आलेला थकवा दूर होतो. झोप येण्यास मदत होते. 

3. ताण तणाव दूर करण्यासाठी आंघोळ हा चांगला उपाय आहे. रात्री कोमट पाण्यानं आंघोळ केल्यानं शरीराला आराम मिळतो. मन शांत होतं. मूड छान ताजा तवाना होतो. दिवसभराच्या कामातून आलेला तणाव कमी करण्यासाठी रात्री आंघोळ केल्यास फायदा होतो. 

Image: Google

4. रात्री झोपण्याआधी आंघोळ केल्यानं मनातली चिंता, भीती, तणाव दूर होतो. कामामुळे शरीर, स्नायू दुखत असल्यास रात्री कोमट पाण्यानं आंघोळ केल्यास स्नायू मोकळे होतात.  स्नायूदुखी आणि सांधेदुखीत रात्री झोपण्याआधी केलेली आंघोळ फायदेशीर ठरते. 

5. वजन कमी करण्यासाठी रात्री केलेली आंघोळ फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्मांक जळतात. शरीरात साठलेली चरबी कमी होवून वजन नियंत्रित होण्यासाठी, कमी होण्यासाठी फायदा होतो.  रात्री आंघोळ करण्याचे फायदे अनेक आहेत. पण रात्री आंघोळ केली म्हणून सकाळी आंघोळ करायची नाही असं  नाही. सकाळी आंघोळ केली नाही तर दिवस आळसावलेला जातो, दिवसभर थकवा वाटतो. शरीरर आणि मनाचं आरोग्य जपण्यासाठी सकाळी आणि रात्री आंघोळ करणं आवश्यक आहे. 


 

Web Title: Benefits of bathing at night... Bathing at night is important for physical and mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.