Join us   

रोज मुठभर चवळी खा, भरपूर मिळेल प्रोटीन, फार मेहनत न करता वजन होईल कमी-स्लिम दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 9:48 AM

Benefits of Chawli Beans : प्रोटीनशिवाय इतर पोषक तत्वही असतात. म्हणूनच डाळी जगभरातील सगळ्यात पौष्टीक पदार्थांपैकी एक आहेत.

डाळ प्रोटीनचा (Protein) सगळ्यात चांगला स्त्रोत मानली जाते. लोक आपल्या आहारात डाळींचा समावेश करतात. डाळी प्रोटीन, व्हिटामीन आणि खनिजांनी परिपूर्ण असतात. याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. व्हेजिटेरियन लोकांसाठी डाळ पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे. (Benefits of Chawali Beans) यात प्रोटीनशिवाय इतर पोषक तत्वही असतात. म्हणूनच डाळी जगभरातील सगळ्यात पौष्टीक पदार्थांपैकी एक आहेत. (Cowpea Chawli Incredible Health Benefits Of This Protein)

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार एक ग्राम चवळीच्या डाळीत १३ ग्राम प्रोटीन आणि इतर पोषक तत्वही असतात. ज्यामुळे पूर्ण दिवस शरीर एर्नेजेटीक राहतं आणि शरीर मजबूत होण्यास मदत होते. या डाळींच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते.  यात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. (healthy reasons to eat cowpeas or chawli)

चवळी खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रियाही चांगली राहते.  हृदयाच्या आरोग्यावरही याचा सकारात्मक परिणाम होतो. झोपेशी निगडीत समस्या टाळण्यासाठी चवळीचे सेवन फायदेशीर ठरते. यात आयर्नचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे एनिमियापासून बचाव होतो. 

रोज चवळी खाण्याचे फायदे १) चवळीची डाळ हाडांसाठी बरीच फायदेशीर ठरते. डाळ अर्धा कप पाण्यात भिजवून ठेवा. यातून ८ टक्के कॅल्शियम मिळेल. रोज या डाळीचे सेवन  केल्यास हाडं मजबूत होण्यास मदत होतात. सांधेदुखी, शारीरिक कमकुवतपणा या समस्या दूर होतात.

रोज चालता तरी पोट १ इंचही कमी होत नाही? ५ चुका टाळा, वजन पटापट कमी होईल-फिट दिसाल

२) जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर या चवळीचा आहारात समावेश करू शकता. या डाळीत सोल्युबल फायबर्स असतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. यात प्रोटीन आणि पचण्यास वेळ घेणारे कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे  बराचवेळ तुमचं पोट भरलेलं राहतं. 

कोण म्हणतं फक्त बदामातून प्रोटीन मिळतं? मूठभर शेंगदाणे खा, प्रोटीन- कॅल्शियम दोन्ही मिळेल

३) रोज चवळी खाल्ल्याने ब्लड शुगल लेव्हल नियंत्रणात राहते. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे पचनक्रिया संथ होते आणि शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. ही डाळ इम्यूनिटी वाढण्यासाठी गुणकारी ठरते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआहार योजना