Join us   

रोज सकाळी उपाशी पोटी खा खोबऱ्याचे २ तुकडे, उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर - वजनही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2023 4:25 PM

Benefits of coconut: Here are 4 reasons to eat raw coconut उपाशी पोटी ओलं खोबरं खाण्याचे ४ फायदे, का आणि कसं खावं खोबरं पाहा.

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. नारळाच्या झाडापासून ते नारळापर्यंत पुरेपूर वापर याचा होतो. रोजच्या आहारात ओल्या व सुक्या नारळाचा वापर होतो. ओल्या खोबऱ्यामुळे पदार्थाची चव तर वाढतेच, यासह आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. यामध्ये प्रोटिन्स, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. याशिवाय नारळ हे फॉस्फरस, तांबे आणि अँटीऑक्सिडंट्सचाही उत्तम स्रोत आहे. परंतु, आपण कधी सकाळी उपाशी पोटी ओलं खोबरं खाण्याचे फायदे ऐकले आहे का?

यासंदर्भात, न्यूट्रीशन क्लीनिकच्या आहारतज्ज्ञ डॉ. सुगीता मुत्रेजा सांगतात, ''सकाळी रिकाम्या पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने आपले आरोग्य निरोगी राहू शकते. उपाशी पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने शरीराला प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. यासह अनेक फायदेही मिळतात''(Benefits of coconut: Here are 4 reasons to eat raw coconut).

त्वचेसाठी फायदेशीर

नारळात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात. इतकेच नाही तर रिकाम्या पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने त्वचेला पोषण मिळते, यासह त्वचा हायड्रेट राहते. नियमित उपाशी पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने ड्राय स्किनची समस्या कमी होते, व त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

२० मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायल्याने महिलेचा मृत्यू? पाणी पिण्याचा अतिरेकही ठरेल जीवघेणा

वेट लॉस करण्यासाठी खा खोबरं

उपाशी पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. नारळात जास्त फायबर आणि कमी चरबी असते. रिकाम्या पोटी नारळ खाल्ल्याने भूक लवकर लागत नाही, व वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय नारळात ट्रायग्लिसराइड्स देखील असते, जे शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठतेपासून आराम

ओल्या नारळामध्ये फायबर जास्त असल्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. खाल्लेलं अन्न पचते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

कितीही व्यायाम केला-डाएट केले तरी ४ चुकांमुळे वजन कधीच कमी होत नाही, पाहा काय चुकतंय..

अँटिऑक्सिडंटने समृद्ध

नारळात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. सकाळी रिकाम्या पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने शरीराला नारळातील अँटीऑक्सिडंट्स मिळतात. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

सकाळी ओलं खोबरं खाण्याची योग्य पद्धत

रोज सकाळी उपाशी पोटी ओल्या खोबऱ्याचे २ ते ३ तुकडे खा. यामुळे त्वचा सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते, वजन कमी करण्यास मदत होते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. जर आपण स्पेशल डाएट फॉलो करत असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय नारळाचा आहारात समावेश करू नका. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न