Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा, तब्येत ठणठणीत-आजारपण राहते दूर-पाहा ५ फायदे...

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा, तब्येत ठणठणीत-आजारपण राहते दूर-पाहा ५ फायदे...

what happens if you eat one spoon of honey daily in monsoon : पावसाळ्यात मध खाण्याचे नेमके फायदे काय आहेत आणि मध खाण्याची योग्य पद्धत पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 05:41 PM2024-07-25T17:41:25+5:302024-07-25T18:04:12+5:30

what happens if you eat one spoon of honey daily in monsoon : पावसाळ्यात मध खाण्याचे नेमके फायदे काय आहेत आणि मध खाण्याची योग्य पद्धत पाहा.

Benefits Of Consuming Honey In Monsoon what happens if you eat one spoon of honey daily in monsoon | पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा, तब्येत ठणठणीत-आजारपण राहते दूर-पाहा ५ फायदे...

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा, तब्येत ठणठणीत-आजारपण राहते दूर-पाहा ५ फायदे...

पावसाळा आला की, आजारांचा धोका वाढतो. या ऋतूत आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी, सांधेदुखी आणि पचना संबंधित आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात निरोगी (Benefits of Consuming Honey in Day-to-Day Life) राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे गरजेचे असते. पावसाळ्यात आपल्या आहारात काही बदल करून आपण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करुन निरोगी राहू शकतो. यासाठी आपण आपल्या आहारात मधाचा समावेश करू शकतो. मध हा एक असा पदार्थ आहे जो आपल्याला अनेक प्रकारे फायदा करू शकतो(Benefits Of Consuming Honey In Monsoon).

मधामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. पावसाळ्यात मध खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि अनेक आजारांपासून आपले रक्षण होते. मध हा नैसर्गिक अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल एजंट आहे. यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, पचन विकार आणि इतर अनेक आजारांपासून आपले रक्षण होते. पावसाळ्यात मध खाल्ल्याने नेमके कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी पावसाळ्यात मध खाण्याचे नेमके फायदे काय आहेत आणि मध कसे खावे याची योग्य पद्धत सांगितली आहे(Benefits Of Consuming Honey In Monsoon).

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खाण्याचे फायदे... 

१. पावसाळ्यात दररोज १ टेबलस्पून मध खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
२. मध खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि फ्लूपासून बचाव करण्यास देखील मदत होते. 
३. मधामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. रोज १ चमचा मध खाल्ल्याने पावसाळ्यात पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

४. वजन कमी करायचे असले तरी रोज १ चमचा मध खाणे फायदेशीर ठरते. 
५. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे पावसाळी सर्दी, खोकला यांसारख्या आजारांना दूर करण्यास मदत करते. 
६. रोज १ चमचा मध खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला शक्ती मिळते.

मध खाण्याची योग्य पद्धत... 

१. पावसाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात मधाचा अनेक प्रकारे समावेश करू शकता.
२. वजन कमी करण्यासाठी १ टेबलस्पून मध पाण्यात मिसळून हे पाणी प्यावे. 
३. खोकला दूर करण्यासाठी रात्री १ टेबलस्पून मध काळी मिरी पूड सोबत खावे.
४. पावसाळ्यात सुंठ पावडर १ टेबलस्पून मधात मिसळून खाल्यानेही फायदा होतो.
५. तज्ज्ञ सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी मध खाण्याचा सल्ला देतात.

Web Title: Benefits Of Consuming Honey In Monsoon what happens if you eat one spoon of honey daily in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.