Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटाचे विकार छळणाऱ्यांनी दहीभात खावा का? न्यूट्रिशनिस्ट सांगतात, दही - भात खाण्याचे फायदे..

पोटाचे विकार छळणाऱ्यांनी दहीभात खावा का? न्यूट्रिशनिस्ट सांगतात, दही - भात खाण्याचे फायदे..

Benefits of curd rice, here’s why every south Indian swears by this healthy meal : हाडांना मजबुती ते वेट लॉस; उन्हाळ्यात दहीभात खाण्याचे फायदे अनेक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2024 04:31 PM2024-05-19T16:31:11+5:302024-05-19T17:34:24+5:30

Benefits of curd rice, here’s why every south Indian swears by this healthy meal : हाडांना मजबुती ते वेट लॉस; उन्हाळ्यात दहीभात खाण्याचे फायदे अनेक..

Benefits of curd rice, here’s why every south Indian swears by this healthy meal | पोटाचे विकार छळणाऱ्यांनी दहीभात खावा का? न्यूट्रिशनिस्ट सांगतात, दही - भात खाण्याचे फायदे..

पोटाचे विकार छळणाऱ्यांनी दहीभात खावा का? न्यूट्रिशनिस्ट सांगतात, दही - भात खाण्याचे फायदे..

मे महिना म्हणजे उकाड्याचा महिना (Summer Special). उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशावेळी आपण आहारात थंड पदार्थांचा समावेश करतो. ज्यामुळे शरीरातील आतील तापमान हे थंडगार राहते (Health Benefits). ज्याचा फायदा आरोग्याला होतो (Curd Rice). तसेच पचनक्रिया सुरळीत चालावी यासाठी हलका आहार घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

हलका आहार म्हणून आपण दही - भात, वरण भात किंवा पचायला हलके असणारे पदार्थ खातो. पण दही-भात सगळ्यांसाठीच योग्य आहार आहे का? दही भात खाण्याचे फायदे किती? दही भात कुणी खाऊ नये? याबद्दलची माहिती न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे(Benefits of curd rice, here’s why every south Indian swears by this healthy meal).

किती आणि कधी पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात, पोट थुलथुलीत असेल तर..

पोषणतज्ज्ञांनी सांगितले की, 'दुपारचे जेवण हलके करण्यासाठी, आपल्याला फक्त तांदूळ, दही आणि मीठ आवश्यक आहे. आपण हे तिन्ही एकत्र करून दुपारी खाऊ शकता. हे प्री आणि प्रो बायोटिकचे परिपूर्ण संयोजन आहे. दुपारच्या जेवणात हे खाल्ल्याने पचनसंस्था सुधारेल. शिवाय भूक आणि ऊर्जा पातळी देखील सुधारेल.'

दही - भात खाण्याचे फायदे

'विकतचे दह्यापेक्षा घरगुती दही केव्हाही उत्तम. घरगुती दही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-१२ पुरेशा प्रमाणात असते. हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारतात.'

सैंधव मिठाचा वापर

दही - भात तयार करताना पोषणतज्ज्ञांनी रॉक मीठ वापरण्याचा सल्ला दिला आहे. पांढऱ्या मिठापेक्षा रॉक मीठ खाणे केव्हाही उत्तम. त्याचे पचन, त्वचेचे आरोग्य आणि चयापचय सुधारण्यात मदत करते.

रोग प्रतिकारक शक्ती वाढेल

आहारात दही आणि भाताचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. दही हे अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. जे शरीराला केवळ मजबूत ठेवत नाही तर संक्रमणांशी लढण्यास मदत करते.

थुलथुलीत मांड्या - हिप्सवरची चरबी वाढली? करा ४ गोष्टी- व्यायाम न करताही घटेल चरबी

हार्मोन्समध्ये वाढ

शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता फोलेटचे सेवन वाढवून भरून काढता येते. फोलेट हे व्हिटॅमिन बी चा एक प्रकार आहे. फोलेटच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशी परिपक्व होत नाहीत. त्यामुळे ॲनिमिया आणि कमी हिमोग्लोबिनची समस्या छळू शकते. तांदळात फोलेटचे प्रमाण चांगले असते. अशक्तपणा कमी करण्यासाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

Web Title: Benefits of curd rice, here’s why every south Indian swears by this healthy meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.