चवीला रुचकर, तिखट, आणि पचनक्रिया सुरळीत ठेवणारा मसाला म्हणजेच ओवा (Ajwain). ओवा फक्त जेवणाची चव वाढवत नसून, याचे आरोग्यदायी अनेक फायदे आहेत. यामुळे पोटाचे विकार तर दूर होतातच शिवाय, कान, तोंड, दात, हृदय यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही उपयुक्त ठरते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांचे आहाराकडे दुर्लक्ष होऊन जाते. लोकं पथ्य पाळत नाही. ज्यामुळे पचन विकार बळावण्याची शक्यता वाढते. शिवाय तळकट-मसालेदार पदार्थांमुळे वजनही वाढते (Weight loss tips). यावर उपाय म्हणून आपण ओव्याचा वापर करू शकता.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ओव्यामध्ये अँटीमाइक्रोबियल, अँटीसेप्टिक आणि अँटीपॅरासायटिक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे सर्दी, खोकला, पोटाचे विकार आणि वजन कमी करण्यास मदत करते'(Benefits Of Drinking Ajwain Water For Weight Loss).
ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे
पचन सुधारते
सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल सुरु आहे. दिवाळीत बरेच जण फराळ, मिठाई दाबून खातात. ज्यामुळे बऱ्याच जणांना पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात. पचनाशी संबंधित त्रास जर वाढला असेल तर, आपण ओव्याचा चहा पिऊ शकता. ओव्यामध्ये विरघळणारे फायबर आढळते, जे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात. शिवाय ओव्याचा चहा प्यायल्याने पोटाचे विकार दूर होतात.
वजन होते कमी
जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचा चहा प्या. ओव्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. शिवाय भूक देखील कमी लागते.
पोटदुखीपासून आराम
ओव्याचा चहा नर्व टॉनिक म्हणून काम करते. ज्यामुळे नसा रिलॅक्स होतात. मासिक पाळी आणि पचनाच्या इतर समस्यांमुळे होणाऱ्या पोटदुखीमध्ये याचे सेवन केल्यास त्वरित आराम मिळतो. त्यातील गुणधर्मांमुळे पोटाला लगेच आराम मिळतो.
४ प्रकारचे पौष्टिक दूध, वाढलेले कोलेस्टेरॉल होईल कमी, रक्ताभिसरण सुधारेल-हार्ट ॲटॅकचा धोका कमी
ओव्याचा चहा कसा तयार करायचा?
सर्वप्रथम, भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा ओवा घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, व चहाच्या गाळणीने गाळून ओव्याचा चहा प्या.