Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळा म्हणून दिवसभर गरम पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? तज्ज्ञ सांगतात...

पावसाळा म्हणून दिवसभर गरम पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? तज्ज्ञ सांगतात...

Benefits of Drinking Hot Water Why Overdoing It May Be Bad : गरम पाण्याचा आरोग्यावर काय आणि कसा परीणाम होतो हे समजून घेऊया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 12:23 PM2022-08-08T12:23:19+5:302022-08-08T12:30:24+5:30

Benefits of Drinking Hot Water Why Overdoing It May Be Bad : गरम पाण्याचा आरोग्यावर काय आणि कसा परीणाम होतो हे समजून घेऊया...

Benefits of Drinking Hot Water Why Overdoing It May Be Bad : Is it beneficial or harmful to drink hot water during monsoon? Experts say... | पावसाळा म्हणून दिवसभर गरम पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? तज्ज्ञ सांगतात...

पावसाळा म्हणून दिवसभर गरम पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? तज्ज्ञ सांगतात...

Highlights एकदम झोपायच्या आधी गरम पाणी प्यायल्याने आपली झोपेची सायकल बिघडू शकते.   गरम पाणी पिण्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. रक्तप्रवाह सुरळीत असेल तर स्नायू रिलॅक्स व्हायला मदत होते आणि दुखणे कमी होते. 

पावसाळा म्हटलं की आपण आरोग्याची जास्त प्रमाणात काळजी घेतो. पावसाळ्याच्या दिवसांत अनेक आजार पाण्यातून पसरतात. अशुद्ध पाण्यामुळे कधी पोट खराब होणे तर कधी आणखी काही समस्या निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत आपण फिल्टर वापरत असूनही पाणी उकळून प्यायला हवे असे वारंवार सांगितले जाते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांनी तर या काळात उकळलेलेच पाणी प्यावे जेणेकरुन आरोग्याच्या विविध समस्यांपासून दूर राहणे शक्य होते. हवेतला गारवा, सर्दी, घशाची खवखव, पोटाच्या समस्या या सगळ्यांसाठी कोमट किंवा उकळून गार केलेले पाणी प्यावे असे डॉक्टर सांगतात. आता हे सगळे ठिक असले तरी अशाप्रकारे नियमितपणे उकळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असते का तोट्याचे? गरम पाण्याचा आरोग्यावर काय आणि कसा परीणाम होतो हे समजून घेणे आवश्यक आहे (Benefits of Drinking Hot Water Why Overdoing It May Be Bad). 

(Image : Google)
(Image : Google)

जास्त पाणी पिणे आणि स्वत:ला हायड्रेट ठेवणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे पचनक्रिया, त्वचा चांगली राहण्यास निश्चितच मदत होते. सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. वजन कमी करण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याचा फायदा होतो. पण दिवसभर गरम पाणी पिणे कितपत योग्य आहे? हेल्थ शॉटसने आहारतज्ज्ञ हरी लक्ष्मी यांच्याशी याविषयी संवाद साधला असता त्यांनी दिवसभर गरम पाणी पिण्याने शरीरावर त्याचे काय परीणाम होतात याविषयी सांगितले. पाहूया गरम पाणी पिण्याचे फायदे...

१. पचनासाठी फायदेशीर 

अनेकांना बद्धकोष्ठता, अॅसिडीटी, एकावेळी नीट पोट साफ न होणे अशाप्रकारच्या पचनाशी निगडीत तक्रारी असतात. पोटात घाण तशीच राहील्यास त्याचा आपल्या एकूण तब्येतीवर परीणाम होतो. त्यामुळे पोट वेळच्यावेळी योग्य पद्धतीने साफ होणे आवश्यक असते. 

२. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात

गरम पाणी पिण्याने शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. गरम पाण्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि आपल्याला घाम येतो. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास फायदा होतो. तसेच आपल्याला सर्दी-कफ झाला असेल तर गरम पाणी प्यायल्याने बराच आराम मिळतो. 

३. अकाली त्वचा सुरकुतण्यापासून सुटका

आपले वय वाढत जाते तशी त्वचा सुरकुतते. पण नियमितपणे गरम पाणी प्यायल्याने त्वचेतील पेशी उत्तेजित राहतात आणि त्या सुरकुतण्याची क्रिया काहीशी मंदावते. त्यामुळे गरम पाणी प्यायल्यास त्वचा मऊ तर दिसतेच पण तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसण्यास मदत होते. 

४. वजन कमी करण्यास फायदेशीर 

वजन कमी करणे हा अनेकांपुझील एक यक्षप्रश्न असतो. सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

५. अॅलर्जीपासून सुटका

सर्दी किंवा घशाशी निगडीत काही अॅलर्जी झाली असेल तर गरम पाण्याने ती दूर होण्यास मदत होते. त्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून आपली सुटका होते. सायनसमध्ये सुधारणा होते आणि श्वसनक्रिया सुरळीत होण्यास याचा फायदा होतो. 

६. रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत 

गरम पाणी पिण्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. रक्तप्रवाह सुरळीत असेल तर स्नायू रिलॅक्स व्हायला मदत होते आणि दुखणे कमी होते. 

७. पाळीतील दुखणे कमी होते

पाळीच्या काळात आपल्याला पोटात दुखणे, क्रॅम्प येणे अशा समस्या उद्भवतात. मात्र गरम पाणी घेत राहिल्यास या समस्या कमी होतात. 

गरम पाणी पिण्याचे तोटे 

१. पाणी खूप जास्त गरम असेल तर जीभेला त्याचा त्रास होऊ शकतो. जीभ भाजली गेली कर आपली चवही जाण्याची शक्यता असते.  

२. शरीराच्या आत असणाऱ्या अन्ननलिका, पोट यांच्यासाठीही खूप गरम पाणी चांगले नाही. त्यामुळे या अवयवांना काही त्रास होण्याची शक्यता असते. 

३. एकदम झोपायच्या आधी गरम पाणी प्यायल्याने आपली झोपेची सायकल बिघडू शकते.   

Web Title: Benefits of Drinking Hot Water Why Overdoing It May Be Bad : Is it beneficial or harmful to drink hot water during monsoon? Experts say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.