Join us   

रात्री झोपण्यापूर्वी जिऱ्याचे पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे, वजन होईल कमी- सुधारेल पचन झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 1:26 PM

Benefits of Drinking Jeera Water At Night : जिऱ्याचं पाणी पिण्याचा उपाय तसा सोपा, रोज रात्री आठवणीने करुन तर पाहा

भारतीय पदार्थांमध्ये जिऱ्याचा वापर होतोच. फोडणीमध्ये जिरं तडतडली की, जेवणाची रंगत वाढलीच म्हणून समजा. जिरे फक्त जेवणाची चव वाढवत नसून, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत, जिरे हा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.

वजन कमी करण्यासाठी अनेक जण सकाळी कोमट पाण्यात जिरे उकळवून पिण्याचा सल्ला देतात. परंतु, आपण झोपण्यापूर्वी देखील एक ग्लास जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. फॅट टू स्लिम ग्रुपच्या सेलिब्रिटी इंटरनॅशनल डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट शिखा शर्मा यांनी रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे शेअर केले आहे(Benefits of Drinking Jeera Water At Night ).

जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

जिऱ्याच्या पाण्यात अँटीमायक्रोबियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, फायबर इत्यादी गुणधर्म असतात. प्रथिने, ऊर्जा, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई इत्यादी पोषक घटकही आढळतात. जिऱ्यामध्ये असलेले घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास, दमा, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती, पचन इत्यादी शरीरातील समस्या कमी करण्यास मदत करतात.

रात्री जेवणानंतर वेलची खाण्याचे ४ भन्नाट फायदे, पचन सुधारेल, तोंडाची दुर्गंधीही दूर होईल

रक्तदाब राहते नियंत्रणात

वाढत्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिऱ्याचे पाणी फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर जिऱ्याचे पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहिल्याने रक्तदाब नियंत्रणात राहते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

पचनक्रिया सुधारते

रात्रीच्या वेळेस जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. जिऱ्यामध्ये पाचक एन्झाईम आढळतात. जे पचन उत्तेजित करण्याचे काम करतात. रात्री डिनरच्या २ तासानंतर ग्लासभर जिऱ्याचे पाणी प्या. यामुळे पचन प्रक्रियेला गती मिळेल.

आयर्नचे उत्तम स्त्रोत

जिऱ्यामध्ये इतर खाद्यपदार्थांपेक्षा १३ पट जास्त लोह आढळते. नियमित जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

जेवल्यानंतर आंघोळ करता? थांबा, आयुर्वेद डॉक्टर सांगतात, पचन बिघडेल-वजनही वाढेल कारण

रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते

रात्री जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्यामुळे इतर रोगांचा धोका कमी होतो. जिरे लोह आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. ज्यामुळे शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते.

उत्तम झोपेसाठी उपयुक्त

झोपण्यापूर्वी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने निद्रानाशाची समस्या कमी होते. रात्री जेवल्यानंतर जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीर, मेंदू व मन शांत होते. ज्यामुळे शरीर रिलेक्स होते, व शांत झोप लागते.

वजन कमी करण्यास मदत

जेवल्यानंतर जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने चयापचय बुस्ट होते. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

या पद्धतीने तयार करा जिऱ्याचे पाणी

साहित्य

जिरे - अर्धा चमचा

पाणी - ५०० मिली

कृती

कोणत्याही भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे घाला. ५ मिनिटांपर्यंत पाण्याला उकळी येऊ द्या. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. व गाळणीने गाळून पाणी एका ग्लासमध्ये घ्या. व कोमट झाल्यानंतर जिऱ्याचे पाणी प्या. मात्र, जिऱ्याचे पाणी नियमित पिण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स