पूर्वीच्या काळी राजे महाराजांच्या काळात चांदीची भांडी सहज पाहायला मिळायची. या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ आणि पाणी ग्रहण केले जात असतं.(Health Benefits of Drinking Water in Silver Glass) सध्या चांदीची भांडी अनेक घरांमधून लोप पावताना दिसत आहे. हल्ली चांदीच्या भांड्यामधून मुलांचे अन्नप्राशन केले जाते. असे म्हटले जाते की, चांदी आपल्या शरीराला निरोगी ठेवते.(Silver Glass for Mental Health and Immunity)
सध्याच्या काळात धातूऐवजी प्लास्टिक आणि स्टीलच्या भांड्यांना अधिक प्रमाणात वापरले जाते. परंतु, या भांड्यात खाणे-पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते.(How Drinking Water in Silver Glass Improves Skin Health) चांदीच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. चांदी हा एक धातू असून शरीराला ताकद देतो. ज्यामुळे आपला मेंदू अधिक तीक्ष्ण होतो.(Benefits of Silver Metal for Health and Wellness) चांदीच्या भांड्यात पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. कंगना राणौत ने देखील तिच्या एका मुलाखतीत ती चांदीच्या ग्लासातून रोज पाणी पिते याविषयी सांगतिले होते. चांदीच्या ग्लासातून पाणी प्यायल्याने आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया. (Drinking Water in Silver for Strong Immunity)
मॉर्निंग वॉकला जाता? या ८ चुकांमुळे हृदयावर येतो ताण, भल्या सकाळी जीव धोक्यात कारण..
1. अशक्तपणा
खाण्यापिण्यासाठी चांदीची भांडी वापरल्याने शरीरात पेशी तयार होतात. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. तसेच पचनाच्या समस्या आणि थकवा देखील दूर होतो.
2. किडनी आणि लिव्हर
चांदीच्या भांड्यांमध्ये पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. हे शरीराला आतून स्वच्छ करतात. ज्यामुळे आपले मूत्रपिंड आणि यकृत निरोगी राहण्यास मदत होते.
3. शरीराचे तापमान नियंत्रणात
चांदीच्या ग्लासात पाणी प्यायल्याने शरीर थंड होते. यामुळे आपल्या शरीराचे तापमान देखील नियंत्रणात राहते. त्यासाठी उन्हाळ्यात आवर्जून चांदीच्या भांड्यात पाणी प्या.
4. पाणी फ्रेश राहाते
चांदीची भांडी नैसर्गिकरित्या बॅक्टेरियामुक्त असतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका नसतो. जर आपण चांदीच्या भांड्यात पाणी किंवा इतर द्रव पदार्थ ठेवले तर बराच काळ फ्रेश राहते.
5. बॅक्टेरियाचा संसर्ग नाही
स्टीलची किंवा प्लास्टिकची भांडी वापरल्याने संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. चांदीची भांडी बॅक्टेरियामुक्त असतात. जर आपण चांदीची भांडी वापरत असू तर बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी होतो.
6. पचनसंस्था निरोगी
चांदीच्या ग्लासातील पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुरळीत होते. यामुळे आतडे स्वच्छ होतात. तसेच गॅस, आम्लता आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते. पित्तदोष, वातदोष आणि कफ विकारापासून सुटका होते.
7. शरीराला डिटॉक्स करा
चांदीच्या ग्लासातील पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. हे शरीराला आतून स्वच्छ करते आणि हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते. तसेच यात असणारे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेचे आरोग्य सुधारतात. मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते.