Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात खायलाच हवा गुळाचा खडा, वजन कमी ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होते मदत; सर्दी-खोकलाही राहतो दूर

हिवाळ्यात खायलाच हवा गुळाचा खडा, वजन कमी ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होते मदत; सर्दी-खोकलाही राहतो दूर

Benefits of eating jaggery in winter : हिवाळ्यात गुळ खाणे म्हणजे आरोग्यासाठी वरदान! आरोग्याला मिळतील ५ जबरदस्त फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2023 03:39 PM2023-12-21T15:39:17+5:302023-12-21T15:39:57+5:30

Benefits of eating jaggery in winter : हिवाळ्यात गुळ खाणे म्हणजे आरोग्यासाठी वरदान! आरोग्याला मिळतील ५ जबरदस्त फायदे...

Benefits of eating jaggery in winter | हिवाळ्यात खायलाच हवा गुळाचा खडा, वजन कमी ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होते मदत; सर्दी-खोकलाही राहतो दूर

हिवाळ्यात खायलाच हवा गुळाचा खडा, वजन कमी ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होते मदत; सर्दी-खोकलाही राहतो दूर

सध्या अनेक लोकं साखरेऐवजी गुळाचा (Jaggery) वापर करतात. गुळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलानुसार गुळ खाण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञांनी दिला असेल. आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले घटक हे गुळामध्ये आढळतात. यात व्हिटॅमिन- ए आणि बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी पॉवर बूस्टर म्हणून काम करते (Health Benefits). त्यामुळे बरेच जण छोटीशी भूक भागवण्यासाठी गुळ शेंगदाणे, गुळ चणा खातात. पण हिवाळ्यात गुळ खाल्ल्याने शरीराला कोण कोणते फायदे मिळतात.

यासंदर्भात, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन गरिमा गोयल सांगतात, 'गंभीर आजार यासह हिवाळ्यातील व्हायरल आजारांपासून गुळ सरंक्षण करते. यात यात साखरेपेक्षा कॅलरीज कमी असतात. यातील अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे आजार दूर राहतात. शिवाय दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते'(Benefits of eating jaggery in winter).

गुळ खाण्याचे जबरदस्त फायदे

थंडीत उबदार ठेवते

गुळ गरम असते. म्हणून उन्हाळ्यात कमी पण हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण गुळाचा एक खडा खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. नियमित गुळ खाल्ल्याने आतून उष्णता वाढते, शिवाय तुम्हाला उबदार ठेवते.

रात्री खात असाल ५ पदार्थ तर शरीरात जमा होतील विषारी घटक..लठ्ठपणा, मधुमेह टाळायचा तर..

विषाणूजन्य समस्यांपासून सरंक्षण

जसजसे हवामान बदलते तसतसे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासह इतर गंभीर आजार निर्माण होतात. पण गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. जे व्हायरल इन्फेक्शन्सपासून दूर ठेवण्यास मदत करते.

शरीर डिटॉक्सिफाय करते

थंडीच्या दिवसात प्रचंड भूक लागते. शिवाय या दिवसात तळकट, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा फार होते. तर काही लोकांना वारंवार चहा पिण्याची इच्छा होते. या पदार्थांमुळे शरीरात टॉक्सिटी वाढते. शिवाय लठ्ठपणाचा धोकाही वाढतो. पण चहामध्ये आपण साखरऐवजी गुळ घालून पीत असाल तर, शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. शिवाय वजनही वाढत नाही.

उर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त

जर आपण सकाळी चहा किंवा गरम पाण्यासोबत गुळाचे सेवन केले तर, शरीरात उष्णता वाढते. यासह थकवा आणि आळसही दूर होतो. हे आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते.

डायबिटीस असेल तर चुकूनही करु नका ५ चुका, शुगर वाढेल आणि तब्येत ढासळेल

अॅनिमिया आणि सांधेदुखीपासून आराम

हिवाळ्यात गुळाचे नियमित सेवन केले तर, त्यातील आयर्न शरीरातील ऑक्सिजन आणि लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. तसेच, यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म सांध्यातील दुखणे आणि वेदनेपासून आराम मिळते.

Web Title: Benefits of eating jaggery in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.