लसूण (Garlic) हा स्वयंपाकघरातील महत्वाचा पदार्थ आहे. लसणात अनेक महत्वाचे गुणधर्म असतात. लसणाशिवाय भाजीला आणि डाळीला चव येत नाही. फोडणीत आवर्जून लसणाचा वापर केला जातो. थंडीच्या दिवसांत लसूण खाल्ल्याने इम्युनिटी वाढते आणि शरीर उष्ण राहण्यासही मदत होते. (Health Tips) जर तुम्हाला लसूण कच्चा खायला आवडत नसेल तर तुम्ही भाजलेला लसूण खाऊ शकता. भाजलेला लसूण चवीलाही उत्तम लागतो. भाजल्यामुळे लसणाची तिखट चव निघून जाते. (Roasted Garlic For Longer Life According To Science) भाजलेले लसूण तोंडी लावण्यासाठी तुम्ही ताटात ठेवू शकता.
हिवाळ्यात तुम्ही लसूण भाजण्यासाठी गॅस किंवा ओव्हनचा वापर करू शकता. लसणाचा वरचा भाग थोडा कापून घ्या. त्यानंतर त्यावर ऑलिव्ह ऑईल लावून मीठ आणि काळी मिरी लावा. त्यानंतर मंद आचेवर रोस्ट करा आणि एक ते दोन कळ्या खा.
लसूण पचल्यानंतर रक्तात विरघळू लागतो यातील तत्वांमध्ये (एलडीएल) बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता असते. २०१८ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार(Ref) लसणात एंटी हायपरलिपिडेमिया इफेक्ट असतो. ज्यामुळे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी होते आणि दीर्घायुष्य लाभते.
काही दिवसांपूर्वी चायनीज अभ्यासात दिसून आले की, जे लोक आठवड्यातून एकदा लसूण खातात त्यांच्या तुलनेत जे लोक रोज लसूण खातात ते लोक जास्त जगतात. यातून असं दिसून येतं की लसूण वाढत्या वयातील लक्षणं कमी करण्यास मदत होते आणि आजारही दूर होतात.
पोट सुटलं-मांड्या जाडजूड दिसतात? थंडीत पपईच्या २-३ फोडी खा, सुटलेलं पोट होईल कमी
ब्लड प्रेशर वाढणार नाही
हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या आजारांचे मुख्य कारण ब्लड प्रेशर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशनच्या रिपोर्टनुसार हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी लसणाचे सेवन फायदेशीर ठरते. लसणातील कंपोनेंट्स ब्लड प्रेशरच्या औषधांप्रमाणेच शरीरावर परिणाम करतात.
कानात साचलेला मळ अलगद बाहेर काढतील ५ उपाय; न दुखता मळ निघेल, स्वच्छ होतील कान
सर्दी-खोकल्यासाठी फायदेशीर
हिवाळ्याच्या दिवसात लसणाच्या पाकळ्यांचे सेवन केल्यास शरीराला बरेच फायदे मिळतात. यातील एंटीइंफ्लामेटरी आणि एंटी ऑक्सिडेंट्समुळे इफेक्ट्स इम्यून सिस्टिम मजबूत राहते आणि सर्दी, खोकल्याची समस्याही उद्भवत नाही. याशिवाय बॅक्टेरिया आणि व्हायरसचा धोका टळण्यास मदत होते. भाजलेला लसूण खाल्ल्याने अल्जायमर, डिमेंशिया दूर होतो, एथलीट परफोर्मेन्स वाढतो, शरीर डिटॉक्स होते आणि हाडांना बळकटी मिळते.