Join us   

हिरवी मिरची खाण्याने खरेच काही फायदे होतात की फक्त पोटात आग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2023 2:45 PM

Benefits Of Green Chillies You Did Not Know About हिरवी मिरची रोज खावी का आपल्या तब्येतीचा काय विचार करावा?

गोड पदार्थ वगळता क्वचितच असा एखादा पदार्थ असेल, ज्यात हिरव्या मिरचीचा वापर होत नसेल. भारतात हिरवी मिरची आवडीने खाल्ली जाते. कच्ची असो किवा तळलेली, हिरवी मिरची लोकं करा - करा चावून खातात. हिरव्या मिरचीशिवाय मसालेदार अन्न बेचव लागते. हिरवी मिरची फक्त जेवणाची रंगत वाढवत नाही तर, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

आपल्या घरात सामान्यतः दोन प्रकारच्या मिरच्या आढळतात. हिरवी आणि लाल. दोघांचेही चव वेगवेगळ्या आहेत. यासह याचे आरोग्यासाठीही वेगवेगळे फायदे आहेत. यासंदर्भात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आहारतज्ज्ञ, रोहित यादव यांनी नियमित मिरची खाण्याचे फायदे सांगितले आहेत(Benefits Of Green Chillies You Did Not Know About).

हिरवी मिरची खाण्याचे ५ फायदे

हृदय निरोगी ठेवते

हिरव्या मिरचीचे सेवन हृदयासाठी खूप फायदेशीर ठरते. हिरवी मिरची खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना लाल मिरचीऐवजी हिरव्या मिरची खाण्याचा सल्ला मिळतो. हिरवी मिरची ट्रायग्लिसराइड्‍स नियंत्रित करण्‍यास मदत करते. ज्यामुळे एथेरोस्‍लेरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

रोज उपाशीपोटी ४ काजू खाण्याचे फायदे, काँस्टीपेशन ते हाडांचा कमकुवतपणा - उत्तम उपाय

मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेह रुग्णांसाठी हिरवी मिरचीचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. दिवसातून एक मिरची नियमित खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हिरव्या मिरचीमध्‍ये आढळणारे कॅप्सेसिन हे अँटीडायबेटिक म्हणून काम करते. अशा स्थितीत मधुमेह रुग्णांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश केल्यास, हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात येऊ शकते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हिरवी मिरची खाण्याचा सल्ला मिळतो. हिरव्या मिरचीमध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण आढळते. हे एक विशेष प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहे, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. याशिवाय मिरचीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

वजन कमी करायचं म्हणून तातडीने चहा ‘बंदच’ करायला हवा का? चहाला पर्याय काय...

पचन सुधारते

हिरवी मिरची व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. अशावेळी याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. यासोबतच मिरची खाल्ल्याने तोंडात जास्त लाळ निर्माण होते. ज्यामध्ये एन्झाईम्स असतात. हे एन्झाईम्स पचनक्रिया अधिक सक्रिय करण्यात मदत करतात. जर कोणाला पचनाशी संबंधित समस्या असतील, तर त्यांनी आवश्य नियमित हिरव्या मिरच्या खाव्या.

वजन नियंत्रित करते

शरीरातील चरबी कमी करण्यासाठी हिरवी मिरची खाण्याचा सल्ला दिला जातो. लाल ऐवजी हिरव्या मिरच्या खा. हिरवी मिरची खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वेगाने वाढते. ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे त्वचेचे मुरुम कमी करण्यास मदत करतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य