Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज सकाळी उपाशीपोटी १ चमचा तूप खाण्याचे ६ फायदे, कॉन्स्टिपेशन आणि वजन दोन्ही होईल कमी

रोज सकाळी उपाशीपोटी १ चमचा तूप खाण्याचे ६ फायदे, कॉन्स्टिपेशन आणि वजन दोन्ही होईल कमी

Benefits Of Having 1 Teaspoon Of Ghee In The Morning तूप आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, वजन वाढण्याच्या भीतीने तूप खाणं टाळू नका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 06:34 PM2023-07-31T18:34:46+5:302023-07-31T18:35:48+5:30

Benefits Of Having 1 Teaspoon Of Ghee In The Morning तूप आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, वजन वाढण्याच्या भीतीने तूप खाणं टाळू नका.

Benefits Of Having 1 Teaspoon Of Ghee In The Morning | रोज सकाळी उपाशीपोटी १ चमचा तूप खाण्याचे ६ फायदे, कॉन्स्टिपेशन आणि वजन दोन्ही होईल कमी

रोज सकाळी उपाशीपोटी १ चमचा तूप खाण्याचे ६ फायदे, कॉन्स्टिपेशन आणि वजन दोन्ही होईल कमी

'खा तूप येईल रूप' ही म्हण तर आपण ऐकलीच असेल. तूप फक्त सौंदर्य वाढवत नसून, आरोग्याच्या दृष्टीने देखील अनेक फायदे देते. त्यातील ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ए मुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. रिफाइंड तेलाऐवजी तुपाचा वापर आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. बहुतांश लोकं चपाती, भात, खिचडी किंवा डाळीवरून तूप घालून खातात. तर काही लोकं सकाळी एक चमचा तूप रिकाम्या पोटी खातात. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने आरोग्याला खरंच फायदा होतो का?

पोषणतज्ज्ञ अवंती देशपांडे यांच्या मते, 'तूप शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत करते. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप खावे. आयुर्वेदानुसार, तूप हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टचे अम्लीय पीएच कमी करते, यासह लहान आतड्याचे कार्य सुधारते'(Benefits Of Having 1 Teaspoon Of Ghee In The Morning).

आतड्याचे कार्य सुधारते

खराब आहार, तणाव, झोपेचा अभाव, बैठी जीवनशैली, या कारणांचा थेट प्रभाव आतड्यांवर पडतो. जर आपण देखील या समस्यांपासून जात असाल तर, तूप खा. नियमित रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने आतड्याचे कार्य सुधारते.

खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?

पचनसंस्था स्वच्छ करते

रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी आणि मजबूत होते. यासह बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या समस्या टाळण्यास मदत होते.

चेहऱ्यावर येते चमक

तूप खाईल त्याला रूप येईल, असं म्हणतात ते खोटं नाही. जर आपल्याला नैसर्गिक ग्लो हवा असेल तर, सकाळी तूप खा. नियमित तूप खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि इतर समस्या दूर होतात.

बद्धकोष्ठतेपासून आराम

ज्यांना आतड्यांसंबंधित त्रास आहे, त्यांनी नियमित तूप खावे. यासह ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी देखील सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खावे. यामुळे पचन तर सुधारतेच, व पोट देखील साफ होते.

वजन कमी करायचंय? उपाशी राहू नका, पोटभर खा ६ पदार्थ, वजन झरझर घटेल

वजन कमी करण्यास मदत

तूप दीर्घकाळ भूक नियंत्रित ठेवते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे वजन आटोक्यात राहते.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

तुपामध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के आहेत, यासह अँटीऑक्सिडंट्सने देखील समृद्ध आहे. तूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराचे विविध रोगांपासून सरंक्षण करते.

Web Title: Benefits Of Having 1 Teaspoon Of Ghee In The Morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.