Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डोक्याला करा चमचाभर साजूक तुपाची मालिश, केस तर सुंदर होतीलच तब्येतीसाठी ५ फायदे

डोक्याला करा चमचाभर साजूक तुपाची मालिश, केस तर सुंदर होतीलच तब्येतीसाठी ५ फायदे

चमचाभर साजूक तूप (desi ghee) कोमट करुन डोक्याला मालिश केल्यास केसांच्या समस्या तर सुटतातच शिवाय आरोग्यासही फायदे (health benefits of desi ghee) मिळतात. रक्त प्रवाह सुधारण्यासाठी, हाडं मजबूत होण्यासाठी डोक्याला साजूक तुपानं (head massage with desi ghee) मालिश करण्याला महत्व आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 06:30 PM2022-08-02T18:30:04+5:302022-08-03T12:01:43+5:30

चमचाभर साजूक तूप (desi ghee) कोमट करुन डोक्याला मालिश केल्यास केसांच्या समस्या तर सुटतातच शिवाय आरोग्यासही फायदे (health benefits of desi ghee) मिळतात. रक्त प्रवाह सुधारण्यासाठी, हाडं मजबूत होण्यासाठी डोक्याला साजूक तुपानं (head massage with desi ghee) मालिश करण्याला महत्व आहे.

Benefits of head massage with desi ghee | डोक्याला करा चमचाभर साजूक तुपाची मालिश, केस तर सुंदर होतीलच तब्येतीसाठी ५ फायदे

डोक्याला करा चमचाभर साजूक तुपाची मालिश, केस तर सुंदर होतीलच तब्येतीसाठी ५ फायदे

Highlightsसाजूक तुपानं केसांच्या मुळाशी मालिश केल्यास डोक्याकडील रक्तप्रवाह सुधारतो.डोक्याला साजूक तुपानं मालिश केल्यानं शारीरिक आरोग्यास तर फायदे मिळतातच सोबतच मानसिक आरोग्यासही फायदे मिळतात.सोरायसिस सारख्या समस्यात उपचार म्हणून डोक्याला साजूक तुपाची मालिश करावी. 

निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात साजूक तूप (desi ghee)  असणं आवश्यक आहे. आरोग्यासाठी फायदेशीर असलेलं साजूक तूप त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायदेशीर असतं. साजूक तूप म्हणजे त्वचेसाठी नैसर्गिक माॅश्चरायझरसारखं काम करतं. त्वचा उजळ होण्यासाठी साजूक तुपाचा फायदा होतो. साजुक तुपामुळे त्वचेशी निगडित समस्याही दूर होतात.  चमचा दोन चमचे साजूक तूप कोमट करुन डोक्याला मालिश केल्यास (head massage with desi ghee)  केसांच्या समस्या तर सुटतातच शिवाय आरोग्यासही फायदे मिळतात. रक्त प्रवाह सुधारण्यासाठी, हाडं मजबूत होण्यासाठी डोक्याला साजूक तुपानं मालिश करण्याला (benefits of head massage with desi ghee)  महत्व आहे. 

Image: Google

साजूक तुपानं डोक्याला मालिश केल्यास..

1. साजूक तुप थोडं गरम करुन त्यानं केसांना मालिश केल्यास डोकेदुखी थांबते. डोकं शांत होतं. तणाव, चिंता कमी होतात. मायग्रेनच्या डोकेदुखीतही साजूक तुपानं मालिश केल्यानं फायदे होतात. 

2. साजूक तुपानं केसांच्या मुळाशी मालिश केल्यास डोक्याकडील रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे केसांनाही पोषण मिळतं. केस गळण्याची, केसांना उंदरी लागण्याची समस्या सुटते. साजुक तुपानं डोक्याला मालिश केल्यास केस मजबूत होतात. 

Image: Google

3. केसातला कोंडा, टाळुची पांढरी त्वचा निघणे, डोक्याला खाज येणं, स्कॅल्प ॲलर्जी, सोरायसिस सारख्या समस्यात उपचार म्हणून डोक्याला साजूक तुपाची मालिश करावी. यामुळे केसातला कोंडा जातो. तसेच टाळूला असलेल्या ॲलर्जीचा प्रभावही कमी होतो. 

4. साजूक तुपानं डोक्याला मालिश केल्यास शरीरावरचा सर्व ताण उतरतो. शरीरात कार्टिसोल हार्मोनची नियंत्रित निर्मिती आणि त्याचं कार्य उत्तम होण्यास साजूक तुपाची मालिश उपयोगी पडते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. 

Image: Google

5. साजूक तुपानं डोक्याला मालिश केल्यानं मेंदूचं कार्य सुधारतं. काम करण्याची एकाग्रता वाढते. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.  डोक्याला साजूक तुपानं मालिश केल्यानं शारीरिक आरोग्यास तर फायदे मिळतातच सोबतच मानसिक आरोग्यासही फायदे मिळतात. मनावरील ताण कमी होण्यास, शांत झोप लागण्यास मदत होते. मानसिक आरोग्य सुधारण्यास साजूक तुपानं मालिश केल्यास फायदा होतो.  

आठवड्यातून  2- 3 वेळा डोक्याला चमचाभर  साजूक तुपानं मालिश केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यास चांगला फायदा मिळतो. मालिश करण्यासाठी साजूक तूप कोमट करुन बोटांच्या सहाय्यानं मालिश करावी. 

Web Title: Benefits of head massage with desi ghee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.