Join us   

रक्त वाढवण्यासाठी टॉनिक आहे 'ही' भाजी; थकवा, अशक्तपणा दूर होऊन वाढेल हिमोग्लोबीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:44 AM

Benefits of Iron Rich Food Spinach : शरीरातली रक्ताची (iron deficiency) कमतरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

हिवाळ्याच्या दिवसात बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. या भाज्यांच्या सेवनानं शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्व मिळतात. (Benefits of Iron Rich Food Spinach) काही भाज्यांच्या सेवनानं कॅल्शियम, लोह मोठ्या प्रमाणावर मिळतं. कमी कॅलरीजयुक्त पालकला सुपरफुड समजले जाते. कारण यात पाण्याचे प्रमाणही अधिक असते. वजन कमी करण्यास हे फायेशीर ठरते. (Benefits of iron rich food spinach and how to eat  to maximize iron absorption and increase blood in body)

शरीरातली रक्ताची (iron deficiency) कमतरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर आणि  न्युट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार पालक खाल्ल्यानं शरीरातील  लोहाचे प्रमाण वाढवता येते.

पालकातील पोषण तत्व

युएसडीएच्या रिपोर्टनुसार १ कप पालकात 3.72 मिलीग्राम आयरन असते. यात प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम आणि व्हिटामीन ए, ई सारखे पोषक तत्व असतात. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार नियमित स्वरूपात पालकाचे सेवन केल्यानं अनेक आरोग्य फायदे मिळतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी  असते. आयरन जवळपास १०० ग्राम असते. कच्च्या पालकात २.७ मिलिग्राम आयरर्न असते. लोहात (100 ग्रॅम) कच्च्या पालकामध्ये 2.7 मिलीग्राम लोह असते, जे दररोजच्या लोहाच्या गरजेच्या 15% आहे.

पालकासोबत काय खाल्ल्यानं रक्ताचे प्रमाण वाढते

पालकाबरोबर काय खायचं काय नाही हे समजून घेतल्यास आयर्न अवशोषण वाढण्यास मदत होईल. पालक व्हिटामीन्स सी युक्त पदार्थांबरोबर खायला हवं. पालकाच्या भाजीत तुम्ही शिमला मिरची, टोमॅटो, ब्रोकोली, कोबी, बटाटे, मटार या भाज्या  खाऊ शकता. 

१) ज्या लोकांना पचनाशी संबंधित समस्या आहेत त्यांना पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. पालकामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, वेदना आणि पोटातील इतर समस्या दूर होतात.

२) पालक शरीरासाठी तसेच आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. पालकामध्ये एक विशेष प्रकारचा पोषक घटक आढळतो, जो त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवतो. यासोबतच त्वचेला हरवलेली चमक, डॅमेज आणि पिंपल्सपासूनही आराम मिळतो.

३) कच्च्या पालकामध्ये व्हिटॅमिन ए आढळते, ते डोळ्यांसाठी खूप चांगले मानले जाते. याशिवाय पालकामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे डोळ्यांशी संबंधित आजारांपासून मुक्त होण्यास मदत करतात.

४) पालकामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे असली तरी त्यात ऑक्सॅलिक अॅसिड देखील आढळते. जर ऑक्सॅलिक ऍसिडचे जास्त प्रमाणात सेवन केले तर ते शरीरातील अनेक पोषक तत्वांच्या शोषणावर परिणाम करू शकते. गर्भवती महिलांना फक्त शिजवलेला पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स