Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळयात कोकम सरबत पिण्याचे ५ फायदे, पित्त - डोकेदुखीचा त्रास होईल कमी आणि...

उन्हाळयात कोकम सरबत पिण्याचे ५ फायदे, पित्त - डोकेदुखीचा त्रास होईल कमी आणि...

Benefits of Kokum Juice in Summer : पारंपरिक कोकम सरबताचे एक से एक भन्नाट फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2023 10:10 AM2023-03-08T10:10:10+5:302023-03-08T13:54:17+5:30

Benefits of Kokum Juice in Summer : पारंपरिक कोकम सरबताचे एक से एक भन्नाट फायदे...

Benefits of Kokum Juice in Summer : Drink sweet and sour kokum syrup after coming out of hot summer, 5 benefits, summer will be bearable... | उन्हाळयात कोकम सरबत पिण्याचे ५ फायदे, पित्त - डोकेदुखीचा त्रास होईल कमी आणि...

उन्हाळयात कोकम सरबत पिण्याचे ५ फायदे, पित्त - डोकेदुखीचा त्रास होईल कमी आणि...

उन्हाळ्याच्या दिवसांत भर उन्हातून घरी आल्यावर आपल्याला खूप तहान तहान होते. इतकंच नाही तर अनेकदा उन्हाचा कडाका इतका जास्त असतो की आपण घामाघूम होतो आणि त्यामुळे अंगातील त्राणही गेल्यासारखे वाटते. अशावेळी लिंबू सरबत, आवळा सरबत किंवा पारंपरिक कोकम सरबत घेतल्यास आपल्याला एकदम तरतरी येते. प्रामुख्याने कोकणात पिकणारे कोकमाचे फळ आरोग्यासाठी अतिशय लाभदायी असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत बहुतांश जणांकडे कोकम आगळ, कोकम सिरप अशा बाटल्या फ्रिजमध्ये असतातच. एरवी आपण कोणी घरी आले की त्यांना चहा किंवा कॉफी घेण्याविषयी विचारतो. पण उन्हाळ्यात मात्र अंगाची लाहीलाही झाल्याने आपण आवर्जून सरबतच पितो. कोकम आरोग्यासाठी का फायदेशीर असते आणि उन्हाळ्यात ते पिण्याचे नेमके काय फायदे आहेत याविषयी (Benefits of Kokam Juice or Sarbat in Summer)...  

१) कोकमचा रस त्वचेसाठी फायदेशीर आहे कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे त्वचेच्या काळजीसाठी फायदेशीर आहेत. ते नियमित प्यायल्याने तुमची त्वचा मुलायम होते.

२) कोकमचा रस शरीरातील उष्णतेची पातळी कमी करतो आणि ऑक्सिडेटिव्ह झीज कमी करतो. जर तुम्ही नियमितपणे रस प्यायला तर कोकम तुमच्या यकृतावरील विषारी रसायनांचा प्रभाव कमी होतो आणि यकृत शुद्ध राहण्यास मदत होते.

(Image : Google)
(Image : Google)

३) अॅसिडीटी हा अनेकांना एरवी किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत होणारा त्रास आहे. कोकमाचा आहारात समावेश केल्यास हा त्रास नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

४) शरीरातील जळजळ अल्झायमर, कर्करोग, संधिवात, हृदयाच्या समस्या आणि इतर अनेक गंभीर आजारांच्या जोखमीशी संबंधित आहे. कोकममध्ये असणारे दाहक-विरोधी गुणधर्म शरीराला या आजारांपासून सुरक्षित ठेवतात.

५) कोकमामध्ये हायड्रॉक्सिल-सायट्रिक ऍसिड असते ज्यामुळे चिंता आणि तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते. सध्या ताणतणावांची पातळी वाढलेली असताना याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

Web Title: Benefits of Kokum Juice in Summer : Drink sweet and sour kokum syrup after coming out of hot summer, 5 benefits, summer will be bearable...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.