Join us   

ऊन खा, ऊन! रोज १० मिनिटे सूर्यप्रकाशात बसा, हाडेच नाही - मानसिक आरोग्यही जपा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 1:14 PM

Benefits of morning sunlight : सूर्यप्रकाश ही आपल्याला मोफत मिळत असलेली एक उत्तम देणगी आहे.

संतुलित जीवनशैली ही आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आहार-विहार, व्यायाम, झोप, ताणतणाव या सगळ्या गोष्टींचे उत्तमरित्या नियोजन करता आले तर आपले आरोग्य नकळतच चांगले राहते. पण यामध्ये सुसूत्रता नसेल तर मात्र आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. शारीरिक आरोग्यासोबतच आपले भावनिक आणि मानसिक आरोग्य चांगले असणेही अतिशय महत्त्वाचे असते.  त्यासाठी आपल्या रुटीनमध्ये काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. सूर्यप्रकाश ही आपल्याला मोफत मिळत असलेली एक उत्तम देणगी आहे. पण आपण तिचा म्हणावा तसा उपयोग करुन घेत नाही. मात्र सूर्यप्रकाश शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर गोष्ट असून नियमितपणे सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ शिवांगी देसाई सूर्यप्रकाशात बसण्याचे महत्त्व समजावून सांगतात (Benefits of morning sunlight). 

(Image : Google)

सूर्यप्रकाशात आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन डी असते त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात आवर्जून बसायला हवे असे आपण अनेकदा ऐकतो. व्हिटॅमिन डी साठी काही वेळा आपण सकाळी मुद्दाम उन्हात जातोही. पण तितकेच उपयोगाचे नसून दिवसभर आपली ऊर्जा टिकून राहावी यासाठीही सूर्यप्रकाश अतिशय फायदेशीर असतो. इतकेच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही सूर्यप्रकाश अतिशय उपयुक्त असतो. शरीरात सेराटोनिन या हार्मोनची निर्मिती होण्यासाठीही सूर्यप्रकाश फायदेशीर असतो. हा हार्मोन आनंदाशी निगडीत असल्याने त्याला हॅपी हार्मोन असेही म्हटले जाते. म्हणूनच आपला मूड चांगला राहावा आणि आपण कायम जास्तीत जास्त आनंदी राहावे यासाठी उन्हात बसण्याचा फायदा होतो. 

आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे नैराश्य आले असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठीही हा हार्मोन अतिशय फायदेशीर ठरतो. म्हणून सकाळी सूर्य उगवण्याच्या २ तास आधी म्हणजेच जेव्हा खूप प्रखर सूर्यप्रकाश नसेल तेव्हा साधारण २० मिनीटे अंगावर सूर्यप्रकाश आवर्जून घ्यायला हवा. अगदी ५ मिनीटांपासून तुम्ही सुरुवात केली तरी तुम्हाला दिवसभर वाटणारा फ्रेशनेस, आनंद यातील बदल तुमचा तुम्हाला लक्षात येईल. यामुळे नकळतच तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होईल, झोपेची गुणवत्ताही सुधारेल. तुमच्या एकूण क्षमता, लक्ष केंद्रित करण्याची पद्धत सगळेच सुधारण्यास ऊन्हात बसण्याची चांगली मदत होईल. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल