मालिश ही एक हिलिंग टेक्निक आहे. दिवसभराचा थकवा किंवा स्नायूंवर आलेला ताण कमी होण्यासाठी मालिश करणे अतिशय फायदेशीर असते. मसाज करणे हा विविध समस्यांवरचा उत्तम उपाय ठरु शकतो. हाडं मजबूत होण्यासाठी, रात्री शांत झोप लागण्यासाठी आणि पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी मालिश करणे अतिशय फायदेशीर ठरते. तीळ किंवा बदामाच्या तेलाने हे मालिश केले तर स्नायू बळकट होण्यास उपयोग होतो. आपल्याला स्वत:च्या हाताने संपूर्ण शरीराला मालिश करणे शक्य नसते. मात्र काही ठराविक अवयवांना मालिश केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. पाहूयात हे अवयव कोणते आणि त्यांना मसाज केल्याने नेमका काय फायदा होतो (benefits of oil massaging 5 body parts at night)...
१. डोकं
केसांची चांगली वाढ होण्यासाठी आणि ते दाट होण्यासाठी झोपताना डोक्याला म्हणजेच केसांच्या मुळांना मालिश करणे फायदेशीर ठरते. डोक्याला मालिश केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि डोकेदुखी किंवा तणाव यांसारख्या समस्या दूर होतात.
२. कान
कानाच्या बाजूला तेलाने मालिश केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. तसेच शरीरातील स्नायुंचे दुखणे कमी होण्यास मदत होते. यासाठी तिळाचं तेल किंवा तुपाचा वापर उपयुक्त ठरतो. मेंदूच्या आरोग्यासाठीही हे मालिश उपयुक्त ठरते.
३. नाक
नाकाला मालिश केल्याने आपली प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. डोकेदुखी आणि तणाव कमी होण्यासाठीही नाकाला मालिश करणे फायदेशीर ठरते.
४. पाय
पायांना मालिश केल्याने दिवसभराचा थकवा निघून जाण्यास मदत होते. शांत झोप लागण्यास तसेच त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यासही याचा चांगला उपयोग होतो. वात दोष कमी होण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी पायांना तेलाने मसाज करणे उपयुक्त ठरते.
५. बेंबी
बेंबी ही आपल्या शरीरातील बऱ्याच अवयावांशी जोडलेली असते. रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी, पचनाच्या तक्रारी दूर होण्यासाठी आणि शरीरावर आलेली सूज कमी होण्यासाठी बेंबीमध्ये तेल घालणे फायदेशीर असते. यासाठी तीळ, एरंडेल, बदाम किंवा कडुनिंब यांच्या तेलाचा वापर करावा.