Join us   

ऑइल पुलिंग म्हणजे काय ? सेलिब्रिटींची योगा ट्रेनर अंशुका परवानी सांगते तोंडाच्या हेल्दी आरोग्यासाठी सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2023 5:25 PM

What is the proper way to oil pulling : 'ऑइल पुलिंग' करण्याच्या सोप्या ५ स्टेप्स, बघा करुन...

सकाळी उठल्यानंतर तोंड धुणं, दात घासणं, आंघोळ करणं हा सगळ्यांचा नित्यक्रम असतो. पण काहीजण सकाळी दात घासल्यानंतर तोंडात नारळाच्या तेलाने गुळणी करतात. तेलाची गुळणी करणं हा प्राचीन उपाय आहे. यालाच आजच्या माॅर्डन भाषेत 'ऑइल पुलिंग' (Oil Pulling) असंही म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी चांगल्या सवयींचा आपल्या आयुष्यात समावेश करणे गरजेचे असते. यासाठी आपण प्रत्येकजण स्वतःला चांगल्या सवयी लावून घेत असतो. या सगळ्या चांगल्या सवयींपैकी 'ऑइल पुलिंग' ही देखील आपल्या ओरल हेल्थची काळजी घेण्यासाठीची एक चांगली सवय आहे(How do you properly do oil pulling).

सध्या 'ऑइल पुलिंग' (What is the proper way to oil pulling) ही संकल्पना फारच चर्चेत असल्याचे दिसत आहे. अनेक सेलिब्रिटीज देखील या 'ऑइल पुलिंग'चा आपल्या डेली रुटीनमध्ये समावेश करताना दिसतात. दात स्वच्छ घासल्यानंतरही तेलाची गुळणी करुन काय मिळतं? तेलाची गुळणी कशी करावी? कोणतं तेल वापरावं? असे अनेक प्रश्न या 'ऑइल पुलिंग' संकल्पनेबद्दल निर्माण होतात. तज्ज्ञ म्हणतात केवळ तोंडाच्या आतील स्वच्छता, तोंडाचे आरोग्य यासाठीच नाही तर फिटनेस राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी देखील 'ऑइल पुलिंग' (Oil Pulling For Teeth)केल्याने अनेक फायदे होतात. तेलाच्या गुळणीचे (How to Do Oil Pulling) फायदे मिळवण्यासाठी तेलाची गुळणी कशी करावी? काय काळजी घ्यावी हे समजून घेणं आवश्यक आहे. अनेक सेलिब्रिटींची योगा ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) हिने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यात तिने 'ऑइल पुलिंग' म्हणजे काय ? ते नेमकं कसं करावं याची सोपी पद्धत सांगितली आहे(How do you do oil pulling  at home).

 'ऑइल पुलिंग' करण्याची नेमकी पद्धत कोणती ? 

स्टेप १ : 'ऑइल पुलिंग' करण्याआधी आपले दात ब्रश व टूथपेस्टने घासून स्वच्छ करुन घ्यावेत. 

स्टेप २ : दात घासून स्वच्छ केल्यानंतर टंग क्लिनरने आपली जीभ स्वच्छ करुन घ्यावी. 

स्टेप ३ : आता संपूर्ण तोंडाची स्वच्छता झाल्यानंतर एका चमच्यात होममेड किंवा नैसर्गिक खोबरेल तेल घ्यावे. 

ब्रा बल्ज दिसल्याने सगळा लूक खराब होतो? करा ३ सोपे उपाय, पाठीवरची लोंबती चरबी होईल कमी...

स्टेप ४ : खोबरेल तेल तोंडात घेतल्यांनंतर ते तसेच तोंडात धरुन ठेवा. खोबरेल तेल तोंडात असतानाच आपण हे तेल तोंडातून उजवीकडून डावीकडे अशाप्रकारे संपूर्ण गोलाकार फिरवू शकतो. या तेलाने आपले संपूर्ण तोंड स्वच्छ होईल अशाप्रकारे हे तेल संपूर्ण तोंडात फिरवून घ्यावे. ज्यामुळे तोंडातील घाण आणि जीवजंतू त्या तेलाला चिकटतील. असे किमान १० ते १५ मिनिटे करत राहावे. 

स्टेप ५ : त्यानंतर हे तेल बेसिनमध्ये थुंकू नये. यामुळे आपले बेसिन खराब होऊन त्यावर चिकट, तेलकट डाग पडण्याची शक्यता असते. यामुळे तेलाची गुळणी केलेले हे तेल एका छोट्या भांड्यात काढून मग योग्य ठिकाणी फेकून द्यावे. जेणेकरुन आपले बेसिन खराब होऊन ब्लॉक होणार नाही.    

दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...

ब्लडप्रेशर कायम कंट्रोलमध्ये ठेवायचं तर करा ३ सोपे उपाय, शरीराला फार कष्ट नाही - बीपी राहील नियंत्रणात...

सुरुवातीला ही प्रक्रिया करणं थोडसं कठीण जाईल मात्र सराव केल्यामुळे तुम्हाला 'ऑइल पुलिंग' नक्की जमू लागेल. 'ऑइल पुलिंग' करताना सुरूवातीच्या काळात तेल पोटात जाण्याची शक्यता दाट असते. मात्र असं झाल्यास काळजी करू नका कारण खाद्यतेल असल्यामुळे त्याचा चुकीचा परिणाम नक्कीच होत नाही. मात्र शक्य असल्यास ते न गिळता फक्त चुळ भरण्याचा प्रयत्न करा. 

'ऑइल पुलिंग' केल्याने होणारे फायदे :- 

नारळाच्या तेलामध्ये अथवा ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म  भरपूर असतात ते तेलावाटे तुमच्या तोंडामध्ये जातात. 'ऑइल पुलिंग' (Oil Pulling) मुळे तुमच्या तोंडाची संपूर्ण स्वच्छता राखली जाते. शिवाय तोंडाचा आतील भाग निरोगीदेखील होतो. 'ऑइल पुलिंग'मुळे तोंडामधील जीवजंतू तेलावाटे बाहेर टाकले जातात. शिवाय यामुळे दात किडणे, तोंडाला दुर्गंध येणे, हिरड्यांचे विकार कमी करण्यास मदत होते. दात आणि हिरड्या मजबूत आणि स्वच्छ होतात. तोंडातून चांगला सुंगध येतो. तोंडाच्या आरोग्याचा  तुमच्या पचनसंस्थेशी संबध येत असल्यामुळे हा उपाय करून तुम्ही तुमच्या अपचनाच्या समस्या कमी करू शकता. ज्यामुळे शरीर शुद्ध आणि डिटॉक्स होण्यास मदत होते. जीभ, तोंड, दात यांचा संबंध तुमचे पोट, पचनक्रिया आणि संपूर्ण शरीरावर होत असल्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते. वजन कमी करायचे असल्यास हा उपाय केल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण पचनक्रिया सुधारल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते. 'ऑइल पुलिंग' केल्यामुळे तुमचे शरीर आणि मन आनंदी आणि उत्साहित राहण्यास मदत होते. ज्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर नक्कीच होतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स