Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गणपती बाप्पाला पंचामृताचा नैवेद्य दाखवण्याचे पारंपरिक महत्त्व; ५ आरोग्यदायी फायदे...

गणपती बाप्पाला पंचामृताचा नैवेद्य दाखवण्याचे पारंपरिक महत्त्व; ५ आरोग्यदायी फायदे...

Benefits of Panchamrut Ganpati Festival special Recipe : परंपरेत लपले आहे शास्त्रीय आणि आरोग्याचे महत्त्व...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2023 01:14 PM2023-09-17T13:14:41+5:302023-09-18T18:41:10+5:30

Benefits of Panchamrut Ganpati Festival special Recipe : परंपरेत लपले आहे शास्त्रीय आणि आरोग्याचे महत्त्व...

Benefits of Panchamrut Ganpati Festival special Recipe : Traditional Significance of Offering Panchamrita to Ganapati Bappa; 5 Health Benefits… | गणपती बाप्पाला पंचामृताचा नैवेद्य दाखवण्याचे पारंपरिक महत्त्व; ५ आरोग्यदायी फायदे...

गणपती बाप्पाला पंचामृताचा नैवेद्य दाखवण्याचे पारंपरिक महत्त्व; ५ आरोग्यदायी फायदे...

गणपती बाप्पाचा नैवेद्य म्हटले की आपल्याला सगळ्यात आधी आठवतात ते मोदक. मग उकडीचे, तळणीचे, खव्याचे आणि आणखीन कसले कसले मोदक आवर्जून केले जातात. बाप्पाला मोदक आवडतात हे खरे असले तरी त्यासोबतच गणपती बाप्पाला आपण साखर-खोबऱ्याची खिरापत, वाटली डाळ, दही भात यांच्याबरोबरच पंचामृताचाही आवर्जून नैवेद्य दाखवतो. हा नैवेद्य बाप्पाला दाखवला की प्रसाद म्हणून आपण घेतो. बाप्पा प्रत्यक्षात काहीच खात नसला तरी त्याच्या रुपाने आपणच हे सगळे खाऊन तृप्त होत असतो. या नैवेद्यामागेही काही शास्त्र आहे असे म्हटले जाते (Benefits of Panchamrut Ganpati Festival special Recipe).

पारंपरिक पद्धतीने बाप्पाला या गोष्टींचा नैवेद्य दाखवण्याचे धार्मिक महत्त्व म्हटले जात असले तरी त्यामागचे शास्त्रीय आणि आहारशास्त्रातील महत्त्व आपण समजून घ्यायला हवे. गणपतीला पंचामृताचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे याचे महत्त्वाचे कारण पंचामृतात असणारे ५ घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. यामध्ये दही, दूध आणि मध यांसारखे पदार्थ वापरण्यात येतात, हे पदार्थ अँटीबॅक्टरीयल असल्याने कोणत्याही इन्फेक्शनपासून आपला बचाव करण्यासाठी या पंचामृताचा चांगला फायदा होतो.  पंचामृताचे आरोग्यासाठी उपयुक्त फायदे कोणते ते पाहूया...  

(Image : Google)
(Image : Google)

१. गर्भवतींसाठी फायदेशीर

पंचामृत म्हणजे एक गोड मिश्रण असते जे गरोदर स्त्रीला पोषक तत्व प्रदान करू शकते. हे बाळाच्या विकासात मदत करते. यामुळे आईच्या स्नायूंना मदत मिळते आणि तिची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. या सोबतच गरोदरपणात पंचामृताचे सेवन केल्याने स्त्री रिलॅक्स आणि स्वस्थ राहते. 

२. पचनक्रियेसाठी उपयुक्त

पंचामृत हे पचन तंत्राला मजबूत करते. ज्यामुळे अ‍ॅसिडीटी, पोटाच्या व आतड्यांच्या समस्या तसेच अल्सर पासून सुद्धा आराम मिळतो. ज्यांची पचनशक्ती काही कारणाने क्षीण झालेली असते अशांनी आवर्जून पंचामृत घ्यावे. 

३. तरतरी येण्यास मदत

पंचामृत शरीराला ताकद देणाऱ्या सात उतींना पोषण देते ज्यात प्रजनन उती, दात, फॅटी टिश्यू, नार्व टिश्यू, मसल टिश्यू, प्लाझ्मा आणि रक्त पेशींचा समावेश होतो. त्यामुळे थकवा आला असेल किंवा अंगात ताकद नसेल तर नियमितपणे पंचामृत घ्यावे. 

(Image : Google)
(Image : Google)

४. बुद्धी तल्लख होण्यास मदत

पंचामृताचे सेवन आपण मुख्यतः पूजेच्या वेळी करतो. पण पंचामृताचं सेवन नियमितपणे केल्यास बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्तीही वाढते. म्हणून गर्भवतींना आवर्जून पंचामृत दिले जाते, जेणेकरुन होणाऱ्या बाळाची बुद्दी तल्लख होईल.

५. त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त 

पंचामृत हे तुमच्या त्वचेसाठी एखाद्या क्लिंजरप्रमाणे काम करते. पंचामृताच्या सेवनाने तुमची त्वचा निरोगी राहते आणि स्कीन सेल्सच्या विकासालाही मदत मिळते, त्यामुळे त्वचेवर आपोआपच ग्लो येतो. पंचामृत खाल्ल्याने केस निरोगी आणि चमकदार होतात. तसेच काही कारणाने केसांची वाढ खुंटली असेल तर ती सुरळीत होण्यास मदत होते.  
 

Web Title: Benefits of Panchamrut Ganpati Festival special Recipe : Traditional Significance of Offering Panchamrita to Ganapati Bappa; 5 Health Benefits…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.