पावसाळा हा ऋतु मोठ्या मंडळींना कितीही छान, प्रसन्न वाटत असला किंवा या दिवसांमध्ये निसर्गाने कितीही मुक्तहस्ते उधळण केली असली तरी घरातल्या लहान मुलांना मात्र हा ऋतू खूप कठीण जातो. कारण वातावरणातल्या बदलांमुळे त्यांना कायम सर्दी- खोकला- ताप अशा आजारांना सामोरे जावे लागते. मुल जर शाळेत जाणारे असेल, तर ते या दिवसांत हमखास इन्फेक्शन घरी घेऊन येते. मग लहान मुलांची दुखणी आवरता आवरता पालकांच्या नाकी नऊ येतात. म्हणूनच तुमच्या मुलांना जर असं वारंवार इन्फेक्शन होऊ द्यायचं नसेल, तर हा घरगुती उपाय (Simple Ayurvedic remedy) पुढील काही दिवस नियमितपणे करून पाहा. (How to Keep Child Safe From Cold, Cough And Other Infections)
पावसाळ्यात मुलं वारंवार आजारी पडू नयेत म्हणून.... हा उपाय इन्स्टाग्रामच्या dr.garimasaxena या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टरांनी मुलांना दररोज नियमितपणे तेलाने मालिश करण्याचा सल्ला दिला आहे.
कुंडीतल्या मातीत मिसळा ३ पदार्थ, तुमच्या छोट्याशा बागेतही फुलतील भरपूर फुलं- झाडं वाढतील जोमानं
पण ती मालिश कशा पद्धतीने, कुठे, केव्हा आणि कोणते तेल वापरून केली पाहिजे, हे जाणून घेणे मात्र खूप गरजेचे आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगतात लहान मुलांना डोक्यावर, बेंबीवर, तळहात आणि तळपाय अशा ४ ठिकाणी दिवसांतून एकदा आवर्जून मालिश केली पाहिजे. एकतर रात्री झोपण्यापुर्वी मालिश करा किंवा मग आंघोळीच्या आधी करा.
मालिश करण्यासाठी त्या भागावर थोडे तेल टाका आणि तुमच्या बोटांनी हळूवार मालिश करा. डोक्याची मालिश करताना समोरच्या टाळूच्या भागाला करावी. मालिश करताना मुलांना खूप जोरजोरात चोळू नये.
अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखाल? लक्षात ठेवा ६ टिप्स, नाहीतर होईल फसवणूक आणि मनस्ताप
आयुर्वेदानुसार अशा पद्धतीने मुलांना मालिश केल्यामुळे शरीरातील काही रंध्रे मोकळी होतात आणि त्यामुळे वारंवार इन्फेक्शन होण्यापासून त्यांचा बचाव होऊ शकतो. मालिश करण्यासाठी तुम्ही क्षीरबाला तेल, मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल यापैकी काहीही वापरू शकता.